SAKAL YIN Monsoon Session: ध्येय निश्चितीसाठी रोडमॅप आवश्यक : डॉ. रवींद्र सपकाळ

Inauguration
Inaugurationesakal
Updated on

SAKAL YIN Monsoon Session : जीवनात माणसाने सकारात्मकता ठेवायला हवी, ‘सकाळ-यिन’ चळवळीचा एक भाग होऊ शकलो, याचे समाधान आहे. विद्यार्थ्यांनी जिद्द निर्माण केल्यास यश हमखास मिळते.

जिद्दीशिवाय यश मिळणार नाही. तसेच, ध्येय निश्चित करण्यासाठी जीवनात रोडमॅप आवश्यक असल्याचे विचार सपकाळ नॉलेब हबचे अध्यक्ष डॉ. रवींद्र सपकाळ यांनी आज येथे व्यक्त केले. (Dr Ravindra Sapkal statement on felicitation at SAKAL YIN Monsoon Session Roadmap needed for goal setting nashik)

सपकाळ नॉलेज हबमध्ये शुक्रवारी (ता. २१) ‘सकाळ-यिन’ केंद्रीय कॅबिनेटच्या दोनदिवसीय पावसाळी अधिवेशनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले.

अधिवेशनाची सुरवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पानसरे, दिलीप धात्रक, प्रसिद्ध उद्योजक राहुल पापळ आदी उपस्थित होते.

डॉ. रवींद्र सपकाळ म्हणाले, की सपकाळ नॉलेज हबमध्ये ६० टक्के मुलींचे प्रवेश आहेत. आत्मविश्वास, दृढ इच्छाशक्तीने काम करा, दोनदिवसीय अधिवेशनातून यिन कॅबिनेटमधील पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक ऊर्जा घेऊन जावी.

ध्येय निश्चित करून अडचणींवर मात करण्याची तयारी ठेवा, ईमानदारीने काम करा अन्यथा दिशाहीन व्हाल, असेही त्यांनी या वेळी नमूद केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पानसरे, दिलीप धात्रक, प्रसिद्ध उद्योजक राहुल पापळ यांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकात ‘सकाळ-यिन’चे संपादक संदीप काळे म्हणाले, की ‘यिन’च्या माध्यमातून ६६ लाख विद्यार्थी चळवळीत सहभागी झाले आहेत. ‘यिन’ चळवळीची सपकाळ नॉलेज हबपासून सुरवात झाली. सर्वच क्षेत्रांत ‘यिन’चे विद्यार्थी कार्यरत आहेत.

विविध सामाजिक संस्थांमध्ये ‘यिन’च्या विद्यार्थ्यांचा सिंहाचा वाटा आहे. ‘यिन’चे राज्य व्यवस्थापक अनिकेत मोरे, ‘यिन’चे उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिकारी गणेश जगदाळे आदींसह ‘यिन’ केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, विविध समित्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते. अवनी शुक्ल यांनी सूत्रसंचालन केले.

विशेष शिष्यवृत्तीची घोषणा

‘सकाळ’ आणि ‘सपकाळ’मध्ये फरक नाही. ‘यिन’चे अधिवेशन दिल्लीनंतर नाशिकमध्ये होत आहे. या पुढील देशपातळीवरच्या अधिवेशनाची जबाबदारी डॉ. रवींद्र सपकाळ यांनी स्वीकारली.

तसेच, सपकाळ नॉलेज हबमध्ये होणाऱ्या विविध विद्याशाखांच्या प्रवेशात ‘सकाळ-यिन’च्या माध्यमातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष दहा टक्के शिष्यवृत्तीची घोषणा डॉ. सपकाळ यांनी या वेळी केली.

Inauguration
Nashik News: आसनगाव- ठाणे महामार्गाचे विस्तारीकरण तातडीने करा; मुख्यमंत्री शिंदे यांच्या सूचना

आपला मेंदू गुगल चालवतोय : राहुल पापळ

उद्योग क्षेत्रात संधी येते, ती ओळखता यायला हवी. आठवीत तीन वेळा अनुत्तीर्ण झालो. रात्रशाळेतही अनुत्तीर्ण झालो. १४ व्या वर्षी सफाई कामगाराचे काम केले. वडील आजारपणात गेले.

आईने माळ विकून उदनिर्वाह सुरू केला, त्या कामात आईला मदत केली. कोणतेही काम करताना मनातून सकारात्मकता हवी. जीवनात संधी मिळाल्यास हो म्हणायला शिका. २००१ मध्ये सुरू झालेल्या प्रवासानंतर दहा वर्षांनी आईस्क्रीम व्यवसायात आलो.

त्यानंतर ४२ आठवडे कंपनीत ‘टॉपर’ होतो. कंपनीने मार्केटिंग हेडची जबाबदारी दिल्यावर नऊ कोटींचा सेल्स १३ कोटींवर नेला. त्यानंतर कंपनीचा राजीनामा देऊन कुल्फीचा नवा ब्रँड विकसित केला.

कंपनीची पहिली बैठक मंदिरात घेतली. देशात परदेशी कंपन्यांनी गरज नसलेल्या वस्तू लादल्या आहेत. व्यवसायात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करावेत. नवीन तंत्रज्ञान अवगत करून बुद्धिजीवी होणे आवश्यक आहे.

मात्र, आपला मेंदू गुगल सोशल मीडिया चालवतो आहे, अशी परिस्थिती आहे. त्याचा गरजेपुरता वापर करण्याचा सल्ला प्रसिद्ध उद्योजक राहुल पापळ यांनी या वेळी दिला.

व्यवसायाचे व्हिजन असावे : बाळासाहेब पानसरे

कोणताही व्यवसाय भांडवलावर चालत नसून, विचारांवर चालतो. व्यवसाय समाजासाठी दिशादर्शन होण्याची आवश्यकता आहे. परंतु, फक्त पैसा पाहून मानवजातीचे हित पाहायचे नाही, असा अलिखित नियम झाला आहे.

व्यवसायाचे समाजासमोर एक व्हिजन असायला हवे. देशात पदवी पाहून नोकरी दिली जाते. मात्र, बुद्धिमत्तेच्या जोरावरच नोकरीत आनंद टिकून राहतो. डोळसपणे समाजात वावरल्यास प्रश्नांची उत्तरे नक्कीच सापडतात.

अभियांत्रिकीचा पेपर सोडून व्यवसायात उतरलो, त्यामुळे व्यवसायात धाडस करायला हवे, व्यवसाय वृद्धीत अनेक कंगोरे आहेत, त्याचा सामना करता यायला हवा, भारतात व्याजदर हा सर्वांत मोठा अडचणीचा विषय आहे.

तसेच, शत्रूतही चांगले गुण शोधल्यास यावर प्रगती ठरत असल्याचे बाळासाहेब पानसरे यांनी या वेळी नमूद केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Inauguration
NDCC Bank: अडचणीतील जिल्हा बॅंकेकडून नवीन MDचा घाट; नवीन व्यवस्थापकीय संचालकास बँक कर्मचाऱ्यांचा विरोध

ध्येय आधीच ठरवा : दिलीप धात्रक

विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना दुसऱ्याने काय केले, याचा विचार न करता तसेच, पालकांनी काय सांगितले यावर अवलंबून न राहता स्वत:चे ध्येय आधीच ठरवावे. जीवनात सतत काम केल्यास यश नक्कीच मिळते, असे त्यांनी सांगितले.

"द्राक्षांची नगरी म्हणून नाशिकची ओळख आहे. द्राक्षांचा थेंब जसा मुळापर्यंत जातो, तसेच ‘यिन’च्या माध्यमातून समाजाच्या मुळापर्यंत, शाश्वत विकासावर भर राहील. त्यावरच अधिवेशनात चर्चा होणार आहे. देशातील विविध घटकांसाठी सारासार विचार करून काय करता येईल, यासाठी प्रयत्नशील आहोत."- दिव्या भोसले, सभापती, ‘यिन’ कॅबिनेट

"प्रत्येक समितीने समन्वय साधत काम करावे. समितीमधील प्रत्येक काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी प्रयत्नशील आहे. दोनदिवसीय ‘यिन’ अधिवेशनातून विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनाची शिदोरी नाशिकमधून घेऊन जात आहोत. अधिवेशातील मार्गदर्शन येणाऱ्या काळात ‘यिन’ कॅबिनेट सदस्यांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरेल."

- अनिकेत बनसोडे, उपसभापती, ‘यिन’ कॅबिनेट

"शासनाच्या विविध माध्यमांतून नागरिकांना आरोग्याच्या सुविधा पुरविणे यासाठी समितीचा प्रयत्न आहे. आरोग्याचे ‘बजेट’ वाढीव मिळावे, पॉलिसी निर्माण करणे, मुख्यमंत्री सहायता योजना, महात्मा जोतिराव फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून कर्करोगासारख्या आजारातील केमोथेरेपीचा समावेश व्हावा."- आकाश टेकवडे, उपाध्यक्ष, केंद्रीय आरोग्य समिती

"देशातील राजकारणात सर्वसामान्य कुटुंबातील युवकांचा सहभाग वाढविणे हे उद्दिष्ट आहे. पॉलिसी मेकिंग राजकारण करण्यासाठी उच्चशिक्षित तरुणांना संधी देणे, राजकीय क्षेत्रात युवकांना आणून त्यांना प्रशिक्षित करणे, राजकारण्यांना शैक्षणिक अट लागू करणे. तसेच, पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार आहोत."

- परमेश्वर इंगोले अध्यक्ष, केंद्रीय राजकीय समिती

"शिक्षण क्षेत्रात प्रात्यक्षिक शिक्षणाचा अभाव आहे. शिक्षणाच्या प्रत्येक प्रवर्गात कौशल्यावर आधारित शिक्षणाचा समावेश असावा, त्यासाठी बदल करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ‘यिन’च्या माध्यमातून शिक्षण या विषयावर सखोल अभ्यास करण्याची संधी मिळाली. शिक्षकतज्ज्ञ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्याशी संवाद साधता आला."

- राजश्री राजेमाने, अध्यक्ष, केंद्रीय शिक्षण समिती

"नाशिकमधील केंद्रीय अधिवेशनात अनेक उद्योजकांचे मार्गदर्शन लाभले आहे. उद्योगांसंदर्भात महत्त्वाची माहिती समिती सदस्यांना मिळाली. या माध्यमातून विविध कंपन्यांबरोबर समिती काम करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात इन्क्यूबेशन सेंटर उभे राहील."

- सुदर्शन सरनाईक, अध्यक्ष, केंद्रीय उद्योजक समिती

"तरुणांना जास्तीत जास्त रोजगार मिळावा, यासाठी ‘यिन’च्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. रोजगार मिळण्यासाठी तरुणांची हेळसांड होत आहे. ती थांबावी, यासाठी समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत."- नवनाथ चकोर, उपाध्यक्ष, केंद्रीय रोजगार समिती

Inauguration
IT Sector Career: विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षितता, AI मध्ये करिअरच्या संधी : तन्मय दीक्षित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.