Nashik News : सर्वाधिक अपघाती मृत्‍यू नुकसान भरपाई; डॉ. शेळकेंना मिळाला न्‍याय

मुंबई- आग्रा महामार्गावर २०१५ ला अपघाताची हृदयद्रावक घटना घडली होती.
Accident News
Accident Newsesakal
Updated on

Nashik News : मुंबई- आग्रा महामार्गावर २०१५ ला अपघाताची हृदयद्रावक घटना घडली होती. परिषदेनिमित्त नाशिकहून पिंपळगावला परतणाऱ्या गाडीच्‍या अपघातात पाच डॉक्‍टरांचा मृत्‍यू झाल्‍याने हळहळ व्‍यक्‍त केली जात होती. दरम्‍यान, या घटनेत चालक डॉक्‍टरांवरच गुन्‍हा दाखल करण्यात आला होता.

न्‍यायालयात खटला लढविताना ॲड. फिरोज सय्यद यांनी डॉक्‍टरांवरील गुन्‍हा रद्द ठरविला. (Dr Shelke got justice in Maximum accidental death compensation nashik news)

सोबत अपघाती मृत्‍यू नुकसान भरपाईपोटी डॉ. प्रताप शेळके यांच्‍या कुटुंबीयांना ३ कोटी ६२ लाख रुपये इतकी रक्‍कम मिळवून दिली आहे. भरपाईची आत्तापर्यंतची ही सर्वाधिक रक्‍कम ठरली आहे. गेल्‍या आठ वर्षांपूर्वी नाशिक येथील नामांकित हॉटेलमध्ये आयोजित डॉक्‍टरांच्‍या परिषदेत अनेक डॉक्‍टर सहभागी झाले होते. यापैकी सहा डॉक्‍टर परिषदेचे कामकाज आटोपून घराकडे पिंपळगावला रवाना झाले होते.

घरापासून अवघे काही किलोमीटरचे अंतर उरलेले असताना कंटेनरसोबतच्‍या जबर अपघातात कारमधील पाच डॉक्‍टरांचा मृत्‍यू झाला होता, तर एक डॉक्‍टर गंभीर जखमी झाले होते. या घटनेने जिल्‍हावासीय सुन्न झाले होते व पिंपळगावच्‍या ग्रामस्थांवर शोककळा पसरली होती. दरम्‍यान या घटनेनंतर दाखल झालेल्‍या गुन्‍ह्‍यात कार चालवत असलेले डॉ. प्रताप शेळके यांना अपघातांसाठी कारणीभूत ठरविण्यात आले होते.

कं‍टेनर मालक व विमा कंपनीने भरपाईचा दावादेखील फेटाळला होता. परंतु न्‍यायालयात लढा देताना ॲड. फिरोज सय्यद यांनी डॉक्‍टरांची बाजू मांडली. सुनावणीदरम्‍यान डॉक्‍टरांवरील गुन्‍हा रद्द ठरविला. इतकेच नाही तर डॉ. शेळके यांच्‍या निधनाने कुटुंबाच्‍या झालेल्‍या नुकसानीपोटी ३ कोटी ६२ लाख रुपये भरपाई रक्‍कम मिळवून दिली आहे.

नुकताच न्‍यायालयाने यासंदर्भात निर्णय पारीत केलेला आहे. अपघात भरपाई रक्‍कमेपोटी मिळालेली ही सर्वात मोठी रक्‍कम आहे. राज्‍यातील मेट्रो शहर वगळता इतर कुठेच इतक्‍या मोठ्या प्रमाणात भरपाई रक्‍कम मिळालेली नसल्‍याचे विधीज्ञांनी सांगितले.

Accident News
Nashik News: समृद्धीवर वाहन उभे करून तरुणाने शेतात संपवले जीवन; 2 दिवसांपासून उभी होती बेवारस कार

जखमी डॉक्‍टरांची साक्ष ठरली महत्त्वाची..

या घटनेत पाच डॉक्‍टरांचा मृत्‍यू झालेला असताना एक डॉक्‍टर जखमी होते. जखमी असलेले डॉ. भोसले यांनी न्‍यायालयात दिलेली साक्ष या खटल्‍यात महत्त्वाची ठरली. त्‍यांची साक्ष ग्राह्य धरुन न्‍यायालयाने या अपघातांसाठी कं‍टेनरची चुक असल्‍याचे निष्कर्ष काढला.

यानंतर अपघातात मृत डॉ. शेळके यांच्‍या कुटुंबाला भरपाई रक्‍कम निश्‍चित केली. दरम्‍यान ८ सप्‍टेंबर २०१५ मध्ये दाखल या खटल्‍यात तेव्‍हापासून आजपर्यंत विमा कंपनीला भरपाई रक्‍कमेवर साडे सात टक्क्‍यांनी व्‍याजदेखील द्यायचे आहे.

इतर डॉक्‍टरांनाही लवकरच न्‍याय

अपघातात मृत इतर डॉक्‍टरांना अपघाती मृत्‍यू नुकसान भरपाईसाठी दाखल खटल्‍यांची प्रक्रिया अंतिम टप्यांत असल्‍याचे समजते. कारचे मालक श्री. पाटील यांना भरपाईपोटी सत्तर लाख रुपये रक्‍कम यापूर्वीच मिळालेली आहे. मृत डॉ. तिवारी, डॉ. जाधव यांच्यातर्फे इतर विधिज्ञ खटला चालवत आहेत. तर मृत डॉ. गांगुर्डे आणि जखमी डॉ. भोसले यांचा खटला ॲड. फिरोज सय्यद चालवत आहेत.

Accident News
Nashik ZP news : माध्यमिकचा पदभार प्रवीण पाटील यांच्याकडेच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.