सटाणा : बागलाण विधानसभा मतदारसंघातील आदिवासी व बिगर आदिवासी भागातील रस्त्यांच्या कामांसाठी राज्य सरकारकडून सोमवारी (ता. १८) नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करून घेण्यात आला. खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी ही माहिती दिली. (Dr Subhash Bhamre statement 41 crores for tribals and non tribals Nashik News)
डॉ. भामरे म्हणाले,की हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आदिवासी व बिगर आदिवासी भागातील कामे सुचविली होती. त्यास पुरवणी मागण्यांमध्ये मंजुरी मिळाली असून हा निधी प्राप्त झाला आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघातील बागलाण तालुक्यातील रस्त्यांसह पूल व इतर कामांचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार राज्य सरकारने निधी मंजूर केली. आता तालुक्यातील महत्त्वाचे जोड रस्ते मुख्य रस्त्यांना जोडून दळणवळणाची मोठी सोय होणार आहे.
या निधीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, आदिवासी विकास मंत्र्यांचे आभार मानले आहेत.
तालुक्यातील होणारी कामे
सरकारच्या निधीतून तालुक्यात होणारी कामे अशी : अहवा-ताहराबाद-नामपूर-लखमापुर-मनमाड रस्ता, काठरेदिगर-कुत्तरबारी-डांगसौंदाणे-सटाणा-मालेगाव रस्त्याच्या अपघात प्रवण क्षेत्राची सुधारणा, सटाणा-अजमेर सौंदाणे-वायगाव रस्ता सुधारणा, कोटी-मुल्हेर ते बाभेश्वर रस्त्याच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम, जाड-गौतमनगर-गोकुळ्पाडा-गव्हाणेपाडा-डवरबारी रस्त्यावरील पुलासह रस्त्याची सुधारणा, जाड-भाटेपाडा रस्त्याच्या पुलासह रस्त्याची सुधारणा, गोळवाड-देऊळपाडा-शेंद्रेपाडा रस्त्याची सुधारणा,
अंतापूर-मळगाव रस्ता सुधारणा, कातरवेल-भिलाटीपाडा रस्त्याच्या ‘स्लॅब ड्रेन'चे बांधकाम आणि रस्त्याची सुधारणा, मुल्हेर-माळीवाडा-देवठाणपाडा रस्त्याची सुधारणा, मोहोळागी-जैतापूर रस्त्याची सुधारणा, अंतापूर-मोहनेदिगर रस्त्याची सुधारणा, बोरसोंडी रस्त्यावर ‘स्लॅब कलवर्ट'सह संरक्षक भिंत बांधणे आणि रस्ता सुधारणा आदी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.