Nashik News: उजवा कालवा, वाढीव चारीस जलसंपदाची मंजुरी : डॉ. सुभाष भामरे

dr. subhash bhamare
dr. subhash bhamareesakal
Updated on

सटाणा : बागलाण तालुक्यातील हरणबारी उजवा कालवा व केळझर वाढीव चारी क्रमांक आठ या दोन्ही प्रकल्पांसाठी राज्याचा जलसंपदा विभागाने मान्यता दिली असल्याची माहिती धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. (Dr Subhash Bhamre statement Right canal approval of increased Charis water resources Nashik News)

डॉ.भामरे म्हणाले, गेल्या तीस वर्षापासून तालुक्यातील तळवाडे भामेर पोच कालवा, केळझर डावा कालवा चारी क्रमांक आठ हे सिंचन प्रकल्प गेल्या तीस वर्षांपासून प्रलंबित होते. या प्रकल्पांच्या पुढील वाढीव काम हे शासकीय मापदंडात बसत नसल्याने या कालव्यांच्या प्रस्तावास शासकीय मंजुरी मिळत नव्हती.

गेल्या ७-८ वर्षांपासून तालुक्यातील इतर ४ प्रकल्पांच्या प्रलंबित कामांना मंजुरी घेताना हरणबारी उजव्या कालव्याचे व वाढीव केळझर चारी क्रमांक ८ साठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता, तांत्रिक बाबी व ईतर अडचणी दुर करण्यासाठी खासदार डॉ. भामरे यांच्याकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते.

कोरोना काळात सुद्धा शासन दरबारी या कालव्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी मुंबई येथे आढावा बैठका घेतल्या. त्यानंतर या कामाला गती मिळाली. सर्वप्रथम कालव्यासाठी पाणी उपलब्ध व्हायला हवे म्हणून वळण बंधारे बांधले गेले.

हरणबारी उजव्या कालव्यासाठी पाणी आरक्षित करून घेण्यात आले. जलवाहिनी आराखडा ‘मेरी’कडून मंजूर करून घेतला. त्यानंतर सदर प्रस्ताव तापी महामंडळ जळगाव येथे पाठवला. तापी महामंडळाने अभ्यास करून त्यातील सर्व तांत्रिक अडचणी दूर केल्या.

नंतर प्रकरण जलसंपदा विभागात पाठवले. जलसंपदा विभागाने त्यातील सर्व अडचणी दूर करून ३० ऑक्टोबर रोजी हरणबारी उजवा कालवा प्रकल्पास मान्यता दिली. प्रकल्पाला निधी उपलब्धता व्हावी यासाठी तो अर्थखात्याकडे पाठविण्यात आला आहे.

dr. subhash bhamare
Nashik Water Supply Scheme: डावा कालवा बंद केल्याने पाणीपुरवठा योजना प्रभावीत

केळझर वाढीव चारी क्रमांक ८ चा पाइपलाइन प्रस्ताव आता ‘मेरी’कडे अंतिम मंजुरीस गेला आहे. लवकरच सर्व परवानगी मिळवून काम सुरू होईल असा आशावादही डॉ. भामरे यांनी व्यक्त केला.

या कामांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वतः मान्यता दिली असल्याचे खासदार डॉ. भामरे यांनी सांगितले.

यावेळी किशोर ह्याळीज,दिनेश देसले, (सरपंच, गोराणे), डॉ. शेषराव पाटील, यशवंत देसले,पोपट जाधव (सरपंच, बिजोटे), केवळ अहिरे (सरपंच, रातीर), समाधान अहिरे (सरपंच, रामतीर), अशोक अहिरे (सरपंच वायगाव),

नितीन अहिरे, सुरेश देसले, चिंतामण देसले, भटू देसले, सुनील जाधव, मधुकर देसले, कान्हू अहिरे, संदीप अहिरे, शिवराज जाधव, अनिल खैरनार (सरपंच कोटबेल), बाबाजी भदाणे (सरपंच खिरमानी), दिनेश गायकवाड (सरपंच, ताळवाडे), मधूकर बागूल, दीपक ठोके, भाऊसाहेब शिरसाठ, सुभाष बधान आदी उपस्थित होते.

dr. subhash bhamare
Dada Bhuse News: दाभाडीत ट्रामा केअर सेंटरला मंजुरी : दादा भुसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()