पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंतसह परिसरातील गावांमध्ये थंडीची जोरदार लाट आली आहे. दिवसाही झोंबणारा गारवा वातावरणात आहे.
त्यामुळे द्राक्षनगरीला अक्षरश: हुडहुडी भरली आहे. पहाटेपासून सुरू झालेला गारठा दिवसभर कायम राहत असल्याने उबरदार वस्त्र नागरिक परिधान करीत आहेत. तापमानात कमालीची घट होत असून, बोचरी थंडीचा सामना करावा लागत आहे. (Drakshanagari full of hood Temperature 15 degrees Celsius Nashik Winter Update)
पिंपळगाव शहरात गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. दिवसाही शीतलहरी वाहत असून, थंडीची तीव्रता अधिक प्रमाणात जाणवत आहे. यंदा अजूनही दरवर्षाप्रमाणे निच्चांकी तापमान नोंदविले गेलेले नाही.
मागील वर्षी तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले होते. बोचरी थंडी पडण्यास सुरवात झाल्याने वयोवृद्ध व्यक्ती त्रस्त आहेत. थंडी दिवसेंदिवस जोर पकडत आहे. थंडीने पिंपळगाव शहराला कवेत घेतले आहे.
बोचऱ्या वाऱ्यामुळे दिवसाही पिंपळगावकर नागरिक स्वेटर व जॅकेट घालून फिरत आहेत. थंडीच्या लाटेसाठी सध्या अनुकुल वातावरण असल्यामुळे पुढील काही दिवसांत तापमानात अजून घट होण्याची शक्यता आहे. माणसाबरोबर द्राक्ष व खरिपातील पिकांनाही हुडहुड भरली आहे.
गोठले खोबरेल तेल
थंडी वाढली की कमी झाली, हे तपासण्याचे सोपे मीटर म्हणजे घरातील खोबरेल तेल आहे. खोबरेल तेल गोठले की थंडी वाढली, असे समजले जाते.
दरवर्षी दिवाळीपासून कडाक्याची थंडी जाणवायला सुरवात होते. यंदा डिसेंबरचा दुसरा आठवडा सुरू झाला, तरी अपेक्षित थंडी नव्हती. दरम्यान, दोन दिवसांपासून पहिल्यांदाच खोबरेल तेल गोठत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.