Nashik News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनात त्यांची सावली बनलेल्या रमाबाई आंबेडकर यांचे जीवनही किती संघर्षमय राहिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्थपणे साथ देणाऱ्या रमाबाई आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यात किती त्याग केला असेल याची प्रचिती ‘रमाई' या नाटकातून उलगडून दाखवण्यात आला. (drama Ramai revealed through monologue experiment Life of Ambedkar Nashik News)
नाट्यसेवा थिएटरतर्फे सादर व दामिनी राजेंद्र जाधव लिखित 'रमाई' या एकपात्री नाटकाचा प्रयोग शुक्रवार (ता. १४) महाकवी कालिदास कलामंदिर येथे सादर झाला. दामिनी जाधव यांनीच ‘रमाई’ ची भूमिका साकारली.
या नाटकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आयुष्यावर प्रकाशझोत टाकताना त्यांच्या कष्टाची जाणीव होते. न्यायव्यवस्थेतून सगळे प्रश्न सुटत नसतील पण जाती व्यवस्थेने सुटतात का, असा प्रश्न उपस्थित करून डॉ. आंबेडकर अन्यायाविरोधात उभे राहिले.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
त्यांनी समानतेचा संदेश दिला. समाज जीवनाचा वेग ढळतो तेव्हा महात्मा जन्म घेतो. महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना आदर्श मानणारे डॉ. आंबेडकर हे सर्वांचे बाबासाहेब झाले.
मग मी आईपणाची जबाबदारी घ्यायला नको का. देवाचे देवपण थोडं तरी घेता आले तरी माणूस म्हणून जगल्याचे सार्थक झाले असेच म्हणावे लागेल. असे आयुष्य जगत रमाबाईंनी बाबासाहेबांना समर्थपणे साथ दिल्याचे हुबेहुब चित्रण या नाटकातून बघायला मिळाले.
दामिनी जाधव यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनीच केले. पियुष जाधव यांनी या नाटकाला संगीत दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.