नाशिक : मुंबई येथून मागविलेल्या मालापैकी संशयित ट्रक चालकाने तब्बल ४ लाख ८२ हजारांचा माल लंपास केल्याचे व्यापाऱ्याच्या लक्षात आले. याप्रकरणी संशयित हितेश नानजीभाई पटेल (रा. विक्रोळी, मुंबई) याच्याविरुद्ध पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (driver himself delayed goods in truck Nashik Crime News)
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
हिरावाडी रोड परिसरातील श्री नाशिक गुड्स ट्रान्स्पोर्टचे मालक नैतिक महेश कतिरा यांचे कार्यालय असून, त्यांनी अहमदाबाद येथून मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या मालाची मागणी केली होती. त्यानुसार संशयित पटेल हा संपूर्ण माल आयशर ट्रकमधून (जीजे २७ टीटी ७५७०) घेऊन आला. शनिवारी (ता. १८) मध्यरात्री शरदचंद्र पवार मार्केट परिसरात त्याने ट्रक उभा केला. प्रवेशद्वाराजवळ त्याने ट्रक खाली करून माल उतरविल्याचे दर्शवले.
यानंतर व्यापारी कतिरा यांनी मालाची तपासणी केली असता, त्या वेळी औषधांचे आठ बॉक्स, सायकल पार्टचे दोन बंडल, हार्डवेअरचा एक बॉक्स, धूपचा बॉक्स, ट्यूबच्या अकरा बॅग्ज आणि तुपाचे १५८ डबे असा चार लाख ८२ हजार २९९ रुपयांचा माल नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. हवालदार सागर कुलकर्णी हे तपास करीत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.