Driving School : तुम्ही बेकायदेशीररित्या वाहन शिकलात का...? नाशिकमध्ये झालाय पर्दाफाश

Jail Road : RTO officials cracking down on illegal driving schools
Jail Road : RTO officials cracking down on illegal driving schoolsesakal
Updated on

पंचवटी : शहरात वाहन चालविण्याचे बेकायदेशीर प्रशिक्षण देणाऱ्या ड्रायव्हिंग स्कूलचा पर्दाफाश करण्यात आला असून चालकावर आरटीओकडून कारवाई करण्यात आली आहे. संबंधित वाहन जप्त करण्यात आले आहे.

जेल रोडवर चालविल्या जाणाऱ्या या बेकायदेशीररीत्या ड्रायव्हिंग स्कूलची माहिती ड्रायव्हिंग स्कूलच्या असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर जाधव यांनी प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत यांच्याशी संपर्क साधून दिली.

त्यानुसार भगत यांनी सहायक मोटर वाहन निरीक्षक मनीषा चौधरी, अब्बास देसाई व नितीन आहेर यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यांनी मनोज सीताराम भंडारी या बेकायदेशीररीत्या ड्रायव्हिंग स्कूल चालकाचे वाहन जप्त करून त्यावर मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई केली. २५ हजार रुपये दंड केला आहे.(Driving school is also illegal RTO crackdown Impounded of vehicle fine of 25 thousand Nashik News)

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

Jail Road : RTO officials cracking down on illegal driving schools
Nashik Crime News : फिरदौसगंज भागात तरुणावर तलवार, कोयत्याने हल्ला

मग ते परवाने दिले कसे?

गेल्या चार ते पाच वर्षापासून भंडारी बेकायदेशीर ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देत असल्याचे समोर आले आहे. या काळात जवळपास सातशेवर वाहनचालकांना प्रशिक्षण दिले असून अधिकृत ड्रायव्हिंग स्कूल नसतानादेखील प्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहन चालवण्याचे परवाने काढून दिले आहेत.

सारेच बेकायदेशीर

पथकाने जप्त केलेल्या वाहनावर कुठल्याही प्रकारचा अधिकृत ड्रायव्हिंग स्कूलचा फलकदेखील नसून या वाहनाचे कुठल्याही प्रकारचे कागदपत्र पूर्ण नाहीत. गाडीदेखील मुदतबाह्य आहे. मात्र या वाहनात प्रशिक्षण देत असल्याने तशा प्रकारचा बदलदेखील करण्यात आला आहे.

"प्रादेशिक परिवहन विभागाला ड्रायव्हिंग स्कूल पदाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर ड्रायव्हिंग स्कूलबद्दल माहिती दिल्याने कारवाई करण्यात आली. वाहन जप्त करण्यात आले असून आणखी बेकायदेशीर ड्रायव्हिंग स्कूल असल्याची माहिती मिळाली असून, तपासणी मोहीम राबवली जाणार आहे."

- प्रदीप शिंदे, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक.

Jail Road : RTO officials cracking down on illegal driving schools
Nashik News : जेलरोडला गोदातीरी श्री संतधाम भूमिपूजनास संतांचा मेळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()