DRDO क्षेत्रात Drone; घुसखोरीचा होईना उलगडा

Drone
Droneesakal
Updated on

नाशिक : सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोनच्या घुसखोरीच्या सततच्या घटनेमुळे अतिमहत्त्वाच्या संवेदनशिल क्षेत्राची सुरक्षितता धोक्यात आली आहे. तर, उपनगरच्या आर्टिलरी सेंटरमधील ड्रोन घुसखोरीच्या घटनेचा शहर पोलिसांकडून उलगडा झालेला नसतानाच, डीआरडीओ कार्यालयाच्या प्रतिबंधित क्षेत्रातील ड्रोन घुसखोरीची घटनेचा गुन्ह्यातही पोलिसांच्या हाती अद्यापही काहीही लागू शकलेले नाही. (Drone in DRDO field case not yet solved Nashik Latest Marathi News)

Drone
Navratrotsav 2022 : महामार्ग ते गडकरी सिग्नल मार्गावरील वाहतूक मार्गात बदल

आडगाव शिवारात डीआरडीओ कार्यालय क्षेत्र आहे. या क्षेत्रात शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अज्ञात ड्रोनने घुसखोरी केली होती. सदरील क्षेत्र हे प्रतिबंधित असतानाही या क्षेत्रात ड्रोन आल्याने सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परंतु, घटनेला तीन दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती काहीही सुगावा लागलेला नाही. गेल्याच महिन्यात उपनगर हद्दीतील आर्टिलरी सेंटरच्या प्रतिबंधित क्षेत्रातही ड्रोनने घुसखोरी केली होती. त्या प्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला मात्र, या गुन्ह्याचा ही उलगडा होऊ शकलेला नाही. दरम्यान, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या उपस्थितीमध्ये शहरातील ड्रोन व्यावसायिकांची बैठक घेत ड्रोन व्यावसायिकांकडून घेण्यात आल्याचे समजते. यावेळी पोलिस उपायुक्तांसह वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

Drone
Crime Update : गंगापूर रोडवर रंगला सराफाच्या कर्मचाऱ्यांना लुटण्याचा थरार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.