Nashik News : नाशिक रोडच्या सेंट्रल जेलवर ड्रोनची नजर; 6 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Nashik Road Central jail
Nashik Road Central jailesakal
Updated on

Nashik News : ब्रिटिश कालीन नाशिक रोडच्या सेंट्रल जेल वर आता ड्रोन कॅमेरांद्वारे निरीक्षण केले जाणार आहे.

गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांवरही वचक बसवण्यासाठी ड्रोन कॅमेरे कार्यान्वित करण्यात करण्यात येणार असून कारागृह विभाग गतिमान होण्यास मदत मिळणार आहे. त्या अनुषंगाने ड्रोन ची टेस्टिंग करून ड्रोन कार्यान्वित करण्यात आले आहे. (Drone watch on Nashik Roads Central Jail 6 Training of employees Nashik News)

तीन हजारांवर बंदी असलेल्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षेला ड्रोनमुळे कारागृहाच्या आतील आणि बाहेरील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवता येणार आहे. कैद्यांमधील हाणामारीसह अन्य गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवणे सोपे जाणार आहे.

देशातील कारागृहांमध्ये टोळी युद्धातील कैद्यांच्या चकमकी, राजकीय बंद्याची बेकायदेशीर बडदास्त, काही कर्मचाऱ्यांचा भ्रष्ट कारभार वाढला आहे. त्यावर नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कारागृहांमध्ये ड्रोनचा वापर सुरु झाला आहे.

कारागृहात ड्रोनचा वापर करणारे महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशनंतर दुसरे राज्य आहे. परदेशी बनावटीच्या या ड्रोनमध्ये आधुनिक कॅमेरे आहेत. ते नियंत्रणास सोपे आहे. पहिल्या टप्प्यात राज्यात आठ मध्यवर्ती, दोन जिल्हा कारागृहे आणि दोन खुल्या कारागृहात ड्रोनचा वापर सुरु झाला आहे.

नाशिकरोड, येरवडा (पुणे), कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, तळोजा (नवी मुंबई), ठाणे, अमरावती, नागपूर, कल्याण, चंद्रपूर या कारागृहांमध्ये ड्रोनचा वापर गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु झाला आहे. या महत्त्वाच्या कारागृहांच्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर पुण्यात झाले.

त्यात ड्रोन कसे हाताळायचे, त्याचे रिमोट कंट्रोलिंग, देखभाल आदींचे प्रशिक्षण देण्यात आले. नाशिक रोड कारागृहातील सहा कर्मचाऱ्यांनी हे प्रशिक्षण घेतले आहे. नाशिक रोड कारागृहाला चार ड्रोन मिळाल्याची माहिती कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Road Central jail
ZP Employee Transfers : पहिल्या दिवशी जि. प. कर्मचारी बदल्यांची सेन्चुरी!

ब्रिटिशांनी १९२७ ला स्थापन केलेल्या, शंभर एकरवर पसरलेल्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात सध्या तीन हजारावर कैदी आहेत. त्यामध्ये टोळी युद्धापासून दहशतवादी कृत्यापर्यंतच्या कैद्यांचा समावेश आहे.

परदेशी कैदीही आहेत. या सर्व कैद्यांसाठी ५४ बरॅकी, २० यार्ड, ३८६ विभक्त कोठड्या, १७ अतिसुरक्षित विभक्त कोठड्या आहेत. या कारागृहात सुरक्षेसाठी १३५ सीसीटीव्ही कॅमेरे असून जोडीला मोबाईल डिटेक्टर, वॉकी टॉकी सेट, इलेक्ट्रिक डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, मेटल हॅन्ड डिटेक्टर, मोबाईल जॅमर, बॅगेज स्कॅनर, डीप सर्च मेटल डिटेक्टर, नाइट व्हीजन दुर्बीण आहे. आता ड्रोनची साथ लाभल्याने सुरक्षा अभेद्य होणार आहे.

"कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी ड्रोन चा नक्कीच फायदा होणार आहे. बसल्या जागी कारागृहातील सर्व हालचालींचे निरीक्षण करता येणार आहे. सुरक्षा व्यवस्थेचे हे साधन उपयुक्त आहे."- प्रमोद वाघ, अधीक्षक, नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह

Nashik Road Central jail
Police Transfer: राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या जम्बो बदल्या! शहराला 4 सहायक आयुक्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()