शहरात ‘ड्रोन’ बंदी; पोलिस आयुक्तांकडून 16 संवेदनशील ठिकाणे घोषित

Drone
Droneesakal
Updated on

नाशिक : शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर भविष्यात हवाई साधनांमार्फत दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस आयुक्तांकडून (Commissioner of Police) शहरातील महत्त्वाची १६ ठिकाणे ही ‘नो ड्रोन फ्लाय झोन’ घोषित करण्यात आली आहे. तसेच, इतर ठिकाणीदेखील ड्रोन (Drone) उडविण्यासाठी पूर्वपरवानगी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Drones banned in the city 16 sensitive places declared by the Commissioner of Police Nashik News)

मागील चार वर्षात देश- विदेशात ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करण्यात आले आहे. भारतातदेखील जून २०२१ मध्ये जम्मू येथील विमानतळावर स्फोटके असलेली दोन ड्रोन आढळली होती. तसेच, अमृतसर येथेदेखील काही दिवसांपूर्वी ड्रोनच्या माध्यमातून अमली पदार्थाची तस्करी झाल्याचे उघड झाले होते. त्यामुळे दहशतवाद्यांकडून हल्ले करण्यासाठी ड्रोनचा वापर अधिक वाढल्याने भविष्यात शहरातील महत्त्वाच्या ठिकाणीदेखील ड्रोन, पॅराग्लायडर्स, पॅरामोटार्स, हॉटएअर बलून्स, मायक्रोलाइट, एअरक्राफ्ट आदींच्या माध्यमातून हल्ले होण्याची शक्यता आहे. यामुळे या ठिकाणची सुरक्षितता व शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने १६ ठिकाणांवर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्याकडून ‘नो ड्रोन फ्लाय झोन’ घोषित केला आहे. तसेच, या ठिकाणी सर्वांनी ‘नो ड्रोन फ्लाय झोन’ असे फलक ठळक अक्षरात सर्वांना दिसेल असे लावण्याचे आदेश दिले आहे. कोणी या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

ड्रोन उडविण्यापूर्वी लागणार परवानगी

शहरात ज्यांना ड्रोनद्वारे चित्रीकरण करावे लागणार आहे, त्यांना पोलिसांची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी ज्या ठिकाणी ड्रोन उडविणार आहे, त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती, ड्रोन उडविण्याचा कालावधी, तारीख, ड्रोनची सविस्तर माहिती, ड्रोन चालकाचे संपूर्ण नाव, संपर्क, ड्रोन उडविण्याचे प्रशिक्षण असल्याचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत, अशी संपूर्ण माहिती भरून तो अर्ज पोलिसांकडे परवानगीसाठी सादर करावा लागणार आहे.

Drone
Nashik : अंड्याच्या आकाराचा किडनी स्टोन काढण्यात डॉक्टरांना यश

शहरातील १६ संवेदनशील ठिकाणे

-स्कूल ऑफ आर्टिलरी

-इंडिया सिक्युरिटी प्रेस

-करन्सी नोट प्रेस

-एकलहरे थर्मल पॉवर स्टेशन

-शासकीय मुद्रणालय

-श्री काळाराम मंदिर

-एअरफोर्स स्टेशन (बोरगड, म्हसरुळ, देवळाली (साऊथ), देवळाली कॅम्प

-कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल

-मध्यवर्ती कारागृह, किशोर सुधारालय

- महाराष्ट्र पोलिस अकादमी, गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय

-आकाशवाणी केंद्र

-पोलिस मुख्यालय, पोलिस आयुक्तालय

- जिल्हा व सत्र न्यायालय

-जिल्हा शासकीय रुग्णालय

-रेल्वे स्टेशन, नाशिक रोड, देवळाली कॅम्प

-मनपा जलशुद्धीकरण केंद्र (एमपीए, शिवाजीनगर, विल्होळी, अंबड)

Drone
Nashik : आयोध्येत भाविकांना फेब्रुवारी 2024 पासून दर्शन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.