Nashik: निफाड आणि नांदगाव तालुक्यांत दुष्काळ जाहीर; नाशिक जिल्ह्यातील 46 महसूल मंडळांचा दुष्काळसदृश म्हणून समावेश

Relief and Rehabilitation Minister Anil Patil while reviewing the meeting of the Cabinet Sub-Committee on Thursday.
Relief and Rehabilitation Minister Anil Patil while reviewing the meeting of the Cabinet Sub-Committee on Thursday.esakal
Updated on

मुंबई, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील ४६ महसूल मंडळे गुरुवारी (ता. ९) दुष्काळसदृश म्हणून घोषित करण्यात आली. मंत्रालयात नैसर्गिक आपत्तीमध्ये आपद्‌ग्रस्तांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची गुरुवारी बैठक झाली.

यात हा निर्णय झाला. दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार ज्या तालुक्यांत मध्यम अथवा गंभीर दुष्काळी परिस्थितीची शक्यता संभवते, अशा ४० तालुक्यांमध्ये यापूर्वीच ट्रिगर टू लागू झाला आहे.

त्यानुसार यापूर्वीच ४० तालुक्यांतील २६९ महसुली मंडळांत दुष्काळ लागू झाला. त्यात नाशिक जिल्ह्यातील येवला, सिन्नर व मालेगावचा समावेश झालेला होता. (Drought declared in Niphad and Nandgaon talukas Inclusion of 46 Revenue Circles in Nashik District drought like Nashik)

बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष आणि मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री धनंजय मुंडे, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, ‘रोहयो’मंत्री संदीपान भुमरे याबरोबरच संबंधित विभागाचे अप्पर मुख्य सचिव आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

नाशिक जिल्ह्यात या वर्षी अतिशय कमी पर्जन्यमान झाले आहे. अनेक गावांमध्ये उशिरा पाऊस झाल्याने पेरणी उशिरा झाली. पेरणीनंतर चार ते पाच आठवडे पावसाचा खंड पडल्याने असंख्य शेतकऱ्यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या आहेत.

तसेच, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्येही पाऊस न आल्याने कापूस, मका, कांदा, भुईमूग, ज्वारी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जमिनीतील पाणीपातळीत घट झाली. खरीप हंगामातील संपूर्ण पिके वाया गेली आहेत.

जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला. पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावांना टँकरने पाण्याचा पुरवठा करण्याची परिस्थिती निर्माण झाली.

गुरुवारी झालेल्या बैठकीत नाशिकमधील निफाड तालुक्यातील लासलगाव, देवगाव, नांदूरमध्यमेश्वर, निफाड, चांदोरी, रानवड, पिंपळगाव बसवंत, सायखेडा, ओझर, नांदगाव तालुक्यातील नांदगाव, मनमाड, वेहेलगाव, जातेगाव, हिसवल बुद्रुक, नाशिक तालुक्यातील नाशिक, देवळाली, पाथर्डी, माडसांगवी, मखमलाबाद, शिंदे, सातपूर,

गिरणारे, कळवण तालुक्यातील कळवण, नवी बेज, मोकभणगी, कनाशी, बागलाण तालुक्यातील सटाणा, नामपूर, ताहाराबाद, जायखेडा, वीरगाव, मुल्हेर, चांदवड तालुक्यातील चांदवड, रायपूर, दुगाव, वडनेरभैरव, वडाळीभोई, दिघवद, देवळा तालुक्यातील देवळा, लोहोणेर, उमराणे या ४६ महसूल मंडळांचा दुष्काळसदृश म्हणून समावेश करण्यात आला आहे.

Relief and Rehabilitation Minister Anil Patil while reviewing the meeting of the Cabinet Sub-Committee on Thursday.
Vasu Baras Festival: बागलाण पश्चिम पट्यातील गावांसह तालुक्यातील गावागावात वसुबारस पुजनाने दिवाळीस प्रारंभ

या महसुली मंडळांतील गावांना दुष्काळी भागातील गावांसाठी देय असलेल्या सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.

"यापूर्वी झालेल्या राज्य सरकारच्या निर्णयानुसार १५ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे; तर ३२ जिल्ह्यांतील १७८ तालुक्यांमधील ९५९ सर्कल दुष्काळसदृश घोषित केले. उपसमितीची दुसरी बैठक २९ नोव्हेंबरला पुन्हा होणार आहे. त्यात काही सर्कल सुटलेले असल्यास किंवा नव्याने समावेश करायचे असल्यास त्यावर चर्चा होईल. २३ नोव्हेंबरपर्यंत या संदर्भात राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात आले आहेत."

- अनिल पाटील

"शासनाने गुरुवारी जिल्ह्यातील सद्यस्थितीचा विचार करून आठ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. सरकार हे जनतेबरोबर आहे. पुढच्या टप्प्यात बाकीचे तालुकेही दुष्काळी म्हणून जाहीर होऊन त्यांना मदत मिळेल, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करेन."

- दादा भुसे, पालकमंत्री

"नवीन निर्माण झालेल्या काही महसूल मंडळांमध्ये पर्जन्यमापक यंत्रे नाहीत. त्या मंडळांमध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागवून या समितीची पुन्हा बैठक घेऊन उरलेल्या महसूल मंडळांचाही समावेश आम्ही लवकरात लवकर या यादीत करू.

- छगन भुजबळ, मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

"नांदगाव तालुक्यातील आठपैकी पाच महसुली मंडळांचा दुष्काळसदृश म्हणून समावेश करण्यात आला आहे. इतर तीन मंडळांचाही समावेश होण्यासाठी प्रयत्न सुरू असून, लवकरच त्यांचाही समावेश होईल. समावेश न झालेल्या मंडळांतील पर्जन्यमानाच्या नोंदीसंदर्भात संबंधितांना निर्देशित करण्यात आले आहे. या मंडळांचाही त्यात समावेश करण्यात यावा, अशी विनंती मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री अनिल पाटील यांना केली आहे. प्रशासनाऐवजी मी स्वतः मंत्र्यांच्या बैठकीत तालुक्यातील स्थितीचा वास्तववादी आढावा सादर केला."

- सुहास कांदे, आमदार, नांदगाव

Relief and Rehabilitation Minister Anil Patil while reviewing the meeting of the Cabinet Sub-Committee on Thursday.
Nashik Police Combing: नाशिकरोड, अंबड, सातपूरला पोलिसांचे कोबिंग! 50 टवाळखोरांविरोधात कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()