Nashik Rabi Season Crisis: दुष्काळाचा रब्बीला फटका, गव्हाची पेरणी घटली! जिल्ह्यात रब्बीच्या केवळ 44 टक्के पेरण्या

farmer sowing
farmer sowingesakal
Updated on

नाशिक : यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस, दुष्काळामुळे सिंचनाचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवल्याचा परिणाम रब्बी हंगामावर झाला आहे. पाण्याची कमी उपलब्धता असल्याने रब्बीच्या पेरण्या कमी झाल्या आहेत.

निम्मा डिसेंबर उलटूनही जिल्ह्यात रब्बीच्या ४४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात गहू पिकांची फक्त ३४ टक्के पेरणी झाल्याने, गव्हाचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. (Drought hits Rabi, wheat sowing reduced Only 44 percent of Rabi sown in district Nashik)

जिल्ह्यात कमी झालेल्या पावसाचा खरिपापाठोपाठ रब्बी हंगामालाही फटका बसत आहे. जिल्ह्यात जवळपास ६० टक्के पाऊस झाला आहे, तर धरणांमध्ये ८० टक्के पाणीसाठा आहे. हा पाऊस सरासरीपेक्षा कमी आहे.

त्या अनुषंगाने रब्बीसाठी एक लाख १३ हजार ५७६ हेक्टरवर रब्बीची पेरणी क्षेत्र निश्चित केले आहे. यापैकी आतापर्यंत ५० हजार १६५ हेक्टर पेरणी झाली आहे. केवळ ४४.१७ टक्के पेरणी झाली आहे.

साधारणतः डिसेंबरमध्ये सरासरी ७० टक्क्यांहून अधिक पेरण्या होत असतात. परंतु १५ डिसेंबर उजाडलेला असतानाही ५० टक्के पेरण्याही अद्याप झालेल्या नाहीत. कमी पावसामुळे पाण्याची पातळी कमी झाली आहे, यातच शेतीसाठी असलेले पाण्याचे आवर्तनही कमी केले आहे.

त्यामुळे आगामी काळात पिकांना पुरेसा पाणी मिळण्याची शक्यता कमी असल्याने शेतकरी पेरण्यांसाठी धजावत नसल्याचे चित्र आहे.

रब्बीतील गहू व हरभरा हे महत्त्वाचे पीक. मात्र, गव्हाचे सरासरी क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. गव्हासाठी ६४ हजार १५० हेक्टर क्षेत्र निश्चित केलेले असताना आतापर्यंत २१ हेक्टर ८३४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

तर हरभरा पिकाची १५ हजार ३७७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्या तुलनेत यंदा कमी पाण्याच्या असलेल्या ज्वारी पिकाची लागवड वाढली असून, पाच हजार ७८८ हेक्टरवर त्याची पेरणी झाली आहे.

चारा टंचाईच्या दृष्टीने मका लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याने आतापर्यंत पाच हजार ४११ हेक्टरवर (७० टक्के) लागवड झाली आहे.

farmer sowing
Nashik Water Crisis: उन्हाळ कांद्याचे भवितव्य चणकापूरसह इतर धरणांच्या आवर्तनावर अवलंबून!

निम्म्या तालुक्यात पन्नासच्या आत

जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी निम्म्याहून अधिक तालुक्यात ५० टक्क्यांहून कमी पेरण्या झाल्या आहेत. मालेगाव, बागलाण, देवळा, नांदगाव, नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, निफाड, येवला या तालुक्यांत कमी पेरण्या झालेल्या आहेत.

तालुकानिहाय झालेल्या पेरण्या

कळवण (६७.७२ टक्के), नांदगाव (३५.२१), सुरगाणा (५३.६६), नाशिक (४०.२२), त्र्यंबकेश्वर (३६.२८), इगतपुरी (२१.७६), निफाड (४१.६५ ) तर, मालेगाव (१७.४२), बागलाण (४१.५९), देवळा (१५.०१), दिंडोरी (५८.१८), पेठ (४५.१३), सिन्नर (५६.६९), येवला (४२.२१), चांदवड (५१.२५).

farmer sowing
Nashik Water Crisis: पुरपाणी न मिळाल्याने ‘करला’ धरण कोरडेठाक! पाणीपुरवठा योजनांना पडणार मर्यादा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.