Nashik Drought News : अवकाळीचा तडाखा बसलेल्या तालुक्यांत यंदा दुष्काळ; 8 तालुक्यांचा दुष्काळाशी सामना

drought
droughtsakal
Updated on

Nashik Drought News : गेल्या वर्षी अतिवृष्टीचा तडाखा सहन केलेल्या तालुक्यांमध्ये यंदा अभूतपूर्व दुष्काळ पडला आहे. जून २०२२ ते मार्च २०२३ या दहा महिन्यांत जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तीन लाख शेतकऱ्यांचे तब्बल २५८ कोटींचे नुकसान झाले. याच तालुक्यांतील जनतेला यंदा भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

दुष्काळग्रस्त तालुके अशी ओळख असलेल्या मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला व सिन्नर या तालुक्यांत जूनमध्ये अतिवृष्टी झाली. (drought in talukas that had suffered heavy rains last year nashik news)

त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्येही सातत्याने पाऊस पडल्याने दीड लाख हेक्टरवरील पिके, फळबागांचे नुकसान झाले. या नुकसानीची नोंद कृषी विभागाकडे असून, त्यानुसार जिल्ह्यातील ३८ हजार ३४८ हेक्टरवरील बागायत क्षेत्राचे नुकसान झाले.

चार हजार ३२२ हेक्टरवरील फळबागांना या पावसाचा फटका बसला. अतिवृष्टीमुळे उन्हाळ्यातही शेतजमीन ओलिताखाली राहिली. त्यामुळे उन्हाळ्यात कांदा, मक्याचे पीक शेतकऱ्यांना घेता आले. जून २०२३ मध्ये पावसाचा अंदाज बघून शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. मात्र, दोन महिन्यांत साधारणत: रिमझिम पाऊस पडला. ऑगस्ट व सप्टेंबर जवळपास कोरडाच गेल्याने खरिपाची दुबार पेरणी करावी लागली.

तरीही शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही. सलग २१ दिवस पावसाचा खंड असलेल्या भागाची कृषी विभागाने पाहणी केली. त्यात ६० ते शंभर टक्के नुकसान झाल्याचे दिसून येते. आता येथील शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. पण भविष्यात चारा व पाण्याची भीषण टंचाई जाणवू शकते. मालेगाव, नांदगाव, बागलाण, देवळा, कळवण, येवला, चांदवड, सिन्नर या तालुक्यांमध्ये ही परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येते.

drought
Maharashtra School Teacher News : इंग्रजी माध्यमाचेच शिक्षक देणार इंग्रजीचे धडे! शासनाचे परिपत्रक

"अल् निनोच्या प्रभावामुळे राज्यातील पावसाचे प्रमाण भिन्न स्वरूपात राहिले. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत कमी प्रमाणात पाऊस पडला. ढग निर्माण झाले. परंतु उष्णतेमुळे पाऊस पडला नाही. परिणामी यंदा थंडीचे दिवस कमी असतील. उन्हाळाही कडक जाणवेल." - श्रीनिवास, हवामानतज्ज्ञ

जून २०२२ ते मार्च २०२३ पर्यंत झालेले नुकसान

बाधित शेतकरी : ३०००८२

जिरायती क्षेत्र : १०९८६७

बागायती क्षेत्र : ३८३४८

फळपिके : ४३२२

एकूण : १५२५३८ हेक्टर

नुकसान : २५८ कोटी २४ लाख १७ हजार

अवकाळीचा तडाखा बसलेले तालुके

मालेगाव, नांदगाव, बागलाण, देवळा, कळवण, येवला, चांदवड, सिन्नर, दिंडोरी.

drought
Dhule Drought News : साक्री तालुक्यात विहिरींनी तळ गाठला; रब्बीची आशाही फोल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.