Drugfree India: आजपासून ‘नशामुक्त भारत पंधरवडा! अंमलीपदार्थांच्या धोक्याविरुद्ध जनजागृतीसाठी केंद्राचा पुढाकार

Drugfree India
Drugfree Indiaesakal
Updated on

Drugfree India : संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेने २६ जून हा आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिवस म्हणून घोषित केला आहे. केंद्र सरकारने अंमलीपदार्थाच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी ‘ड्रग्समुक्त भारत’ चा संकल्प केला आहे.

त्यानुसार नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने १२ ते २६ जून २०२३ दरम्यान नशामुक्त भारत पंधरवडा जाहीर केला आहे. (Drug free India from today Centers initiative for public awareness against menace of narcotics nashik news)

अंमलीपदार्थाच्या दुष्परिणामाबाबत व धोक्यांविरूद्ध लढण्यासाठी जनजागृती करणे हा या नशामुक्त भारत पंधरवडा उपक्रमाचा उद्देश आहे.

त्याअनुषंगाने राज्यात नशामुक्त भारत पंधरवडा उपक्रमांतर्गत व्यापक स्तरावर उपाययोजना करण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिले आहेत.

आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन २६ जूनला जनजागृती मोहीम, रॅली, चर्चासत्रे, कार्यशाळा, ई-प्रतिज्ञा मोहिमा आदी कार्यक्रमाच्या माध्यमातून नशामुक्त भारत अभियान राबविण्याचे सुचवले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Drugfree India
Gharkul Yojana Scam : घरकुल योजनेत जुनेच घर दाखवून अनुदानही लाटले; अनियमिततेची चौकशी सुरू

राज्यात नशामुक्त भारत पंधरवडाअंतर्गत जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांनी नशामुक्त भारत अभियान समिती व व्यसनमुक्ती केंद्राच्या साहाय्याने समयबद्ध कार्यक्रम अंतर्गत आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन विरोधी दिन व नशामुक्त भारत पंधरवड्यात विद्यापीठ,

महिला मंडळे, युवक मंडळे, स्थानिक स्वयंसेवी संस्था अनुदानित संस्था, सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च महाविद्यालये, अपंग संस्था, आश्रमशाळा, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, स्थानिक कार्यकर्ते यांच्या सहभागाने जनजागृती मोहीम, रॅली, चर्चासत्रे, कार्यशाळा, ई- प्रतिज्ञा मोहिमा राबविण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना ऑनलाइन बैठकीत दिल्या.

"‘नशामुक्त भारत’ चे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे राज्यात पंधरवड्यात विविध कार्यक्रम करण्याच्या सूचना यंत्रणांना दिल्या आहेत."

- सुमंत भांगे, सचिव, सामाजिक न्याय विभाग)

Drugfree India
Samagra Shikasha Abhiyan : जिल्हा परिषद शाळांमध्ये पटनोंदणी पंधरवडा! आशिमा मित्तल यांचे आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.