Drug Racket : महाविद्यालयांपर्यंत पोचले नशेचे ‘रॅकेट’; व्यसनाधीन मुलांसमोर पालक हतबल

Drug Racket
Drug Racketesakal
Updated on

नाशिक : ऐन उमेदीच्या काळात युवापिढी व्यसनाधिन होत असल्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. पालकांकडून सहज उपलब्ध होत असलेल्या पैशांचा मुलांकडून गैरवापर करत नशेच्या गर्तेत अडकत चालले आहेत. काहींनी तर टोकाचे पाऊल उचलत जीवनच संपविले. पालकांनीही सामाजिक भीतीपोटी ही बाब उजेडात येण्यापासून दडविल्याचे गंभीर प्रकार घडले आहेत. दुसरीकडे शाळा-महाविद्यालयांपर्यंत नशेचे रॅकेट पोचले आहे. ते उद्‌ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी तर यापासून सावध राहण्यासाठी महाविद्यालयांमध्ये समुपदेशनाची आवश्‍यकता व्यक्त होत आहे. (Drug racket reached colleges Parents helpless in front of addicted children nashik news)

सिगारेटचा झुरका वा तंबाखूच्या एक पिचकारीपासून सुरू झालेले व्यसन तिथेच थांबत नाही. खुलेआम प्रतिबंधित गुटखा विकला जातो. एमडी ड्रग्ज, गांजा, अफू शहरामध्ये सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे मौजमजा करण्यासाठी घराबाहेर पडणारी युवा पिढी नशेच्या आहारी जात आहे. पालकही या नशाबाज मुलांसमोर हतबल झाले आहेत. ‘सकाळ’कडे भावना व्यक्त करताना काही पालकांनी मुलांच्या भविष्यासाठी पोलिस आणि महाविद्यालयांकडे समुपदेशनाची अपेक्षाच व्यक्त केली आहे.

‘त्याने’ जीवनच संपविले

गौरव (नाव बदलण्यात आले आहे) याचे उच्चशिक्षणाचे ध्येय होते. घरात आर्थिक सुबत्ता, शहरात उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या गौरवला महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान एमडीचे व्यसन जडले. पालकांच्या लक्षात ते कधीच आले नाही. सुरवातीला त्याच्याच खोलीत राहणारा गौरव नंतर मित्रांच्या रूमवर जाऊन राहू लागला. अभ्यासासाठी राहत असल्याचे त्याने पालकांना भासविले. प्रत्यक्षात तो एमडीच्या प्रचंड आहारी गेला होता. त्यासाठी तो घरातून काहीही कारणे सांगून पैसे मागू लागला.

हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत गेल्याने पालकांना शंका आली. त्यांनी विश्‍वासात घेतल्यानंतर खरा प्रकार समोर आला. त्याला नैराश्‍याने ग्रासले होते. नातलगांमध्ये वावरताना त्याचे वागणे विचित्र असायचे. त्यामुळे पालकांनी त्यास औषधोपचाराचा सल्लाही दिला. मात्र, एका रात्री नैराश्‍याने ग्रासलेल्या गौरवने टोकाचे पाऊल उचलले आणि जीवन संपविले. पोलिसांत आकस्मिक नोंद झाली. परंतु, त्याचे खरे कारण समोर आलेच नाही. पालकांनाही सामाजिक प्रतिष्ठेची भीती होती.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

Drug Racket
Water Resources Agreement : वाढीव पाणी आरक्षणाचा मार्ग मोकळा

‘तिला’ स्मोक करणे गैर वाटत नाही

तिचे नाव विद्या (नाव बदलले आहे). अवघ्या १८ वर्षांची विद्या अभ्यासात हुशार, त्यामुळे तिला परजिल्ह्यात चांगल्या महाविद्यालयात शिक्षणासाठी पाठविले. मात्र काही दिवसांत तिच्या वागण्यात बदल झाल्याचे पालकांच्या लक्षात आले. सुट्यांमध्ये ती घरी आली असता पालकांना तिच्या वर्तणुकीतही बदल जाणवला. तिच्या खोलीत ती एकटीच सिगारेट ओढत असल्याचे पालकांच्या लक्षात आले.

तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, तिला त्यात काहीच गैर वाटत नसल्याचे ती म्हणाली. पालकांनी हतबल होऊन तिला मानसोपचार तज्ज्ञांकडे आणले. तेव्हाही ती पालकांनी मुलींवरच का बंधने घालावी. शहरांमध्ये अनेक मुली स्मोक करतात. मी केल्याने काय बिघडले, असा तिचा साधा प्रश्‍न होता. सिगारेटच्या माध्यमातून तिला भलतेसलते व्यसन जडले तर काय, असा विचार करीत पालक हतबल झाले होते.

अभ्यासाचा ताण हलका वाटतो

अरिहंत (नाव बदलले आहे.) इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. अभ्यास करीत असताना भविष्याचा विचार करताना त्याला ताण जाणवतो. त्यासाठी तो स्वत:ला अभ्यासात झोकून देतो. परंतु, अभ्यासाच्या वाढत्या ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी अरिहंतने सुरवातीला गांजाची सिगारेट ओढली. हलके वाटल्याचे तो सांगतो. हे हलके वाटणे त्याला नंतर हवेहवेसे वाटू लागले. पण प्रत्येक वेळी ती नशा करण्याचे प्रमाण वाढू लागले. स्वत:ला रोखण्याचा वा त्यापासून दूर जाण्याचा त्यानेही प्रयत्नही करून पाहिला. परंतु त्यात तो अपयशी ठरला. परिणामी त्याचे करिअर बरबाद झाले. पालकांनी समुपदेशन व औषधोपचार सुरू केले.

"जशी नशा शरीराला जडते, तसेच त्यापासून शरीराला औषधोपचाराने सोडविताही येते. फक्त त्यासाठी सकारात्मक विचार हवेत. नशेमुळे शरीरात जे रासायनिक बदल होतात, त्यावर मात करण्याची क्षमता औषधोपचारात आहे. नशेपासून परावृत्त होऊन पुन्हा पूर्वीचे साधे आयुष्य जगता येते." - डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचारतज्ज्ञ

Drug Racket
Nashik News: ‘Civil’मधील कंत्राटी कर्मचारी विनावेतन; सफाई कामगारांसमोर आर्थिक संकट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()