नाशिक : अनंत चतुर्थी आणि पवित्र शुक्रवार असे दोन्ही योग एकच दिवशी जुळून आले. त्याचे दर्शन गणेश विसर्जन मिरवणुकीत बघावयास मिळाले. अजान सुरू होताच शिवसेवा मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल पथकाचे ढोल वाजवणे थांबवून हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवून दिले.
समाजात सध्या काही समाज विघाटक घटकांकडून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशात शहराच्या हिंदू मुस्लिम बांधवांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत मात्र ऐक्याचे दर्शन घडवून एक आदर्श निर्माण केला.
गणेश विसर्जन अर्थात अनंत चतुर्थीचा दिवस आणि इस्लाममध्ये एक पवित्र दिवस म्हणून ओळखला जाणारा पवित्र शुक्रवार दोघांचा योग शुक्रवार(ता.९) अर्थात अनंत चतुर्थीला जुळून आला. एकीकडे अजानचे सूर आणि दुसरीकडे गणरायाचा जयघोष असे दोन्ही सूर एकाच वेळी ऐकण्याचा योग देखील हिंदू मुस्लिम बांधवांना अनुभवास मिळाला. (drums in Bappa procession stopped when ajaan started nashik unity in diversity news)
गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कोकणीपुरा येथील मशीदमध्ये असरची अजान सुरू होताच परिसरात असलेल्या शिवसेवा मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक धार्मिक एकोप्याचे दर्शन घडवले. मंडळाच्या चित्ररथासमोर असलेल्या ढोल पथकाच्या वादकांना काही वेळ वादन बंद करण्याच्या सूचना केल्या.
अजान सुरू होती, तोपर्यंत सर्व ढोल पथकातील वादक वाद्यांसह शांत उभे होते.असे करून एक वेगळा आदर्श निर्माण केला. अजानचा समारोप होताच पुन्हा जल्लोषात ढोल पथकाने वाजंत्री सुरू करत पुढे मार्गक्रम केले. यावेळी उपस्थित भाविकांना हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडून आले. नाशिक शहर नेहमी अशा प्रकारे धार्मिक एकोपाचे दर्शन घडवत आला आहे. आणि म्हणूनच सर्वत्र शहराचे एक वेगळेच नावलौकिक आहे.
दुसरीकडे मुस्लिम बांधवांनी देखील शुक्रवारचा पवित्र दिवशी विशेष नमाजसाठी मुस्लिम बांधव मशीदमध्ये गर्दी करत असतात. अशा वेळेस गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी असलेल्या आपल्या हिंदू बांधवांना कुठली अडचण भासू नये. यासाठी मिरवणूक मार्गावरील दूध बाजार येथील हेलबावडी मशीदच्या विश्वस्तांसह मौलवींनी मार्गावरील मशीदचा मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवला. नमाजसाठी येणाऱ्या बांधवांना मागील प्रवेशद्वार उघडून देण्यात आले. अशाप्रकारे हिंदू मुस्लिम बांधवांच्या समाजस्य भूमिकेमुळे यंदाही गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात आणि शांततेत संपन्न झाली.
मिरवणुकीची विशेषता
गणेश विसर्जन मिरवणुकीची विशेषता म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून गणेश विसर्जन मिरवणूक मुस्लिम बहुल भागातून काढण्यात येते. हिंदू मुस्लिम दोन्ही समाज बांधव मिरवणुकीत सहभागी होत असतात. कुठल्याही प्रकारचा तेढ निर्माण होत नाही. दोन्ही समाज बांधव समाजस्यची भूमिका घेत धार्मिक सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवत असतात.
शिवसेवा मित्र मंडळाचे कौतुक
आज बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू असताना मशिदीतून अजून सुरू झाली, त्यावेळी मिरवणुकीतील शिवसेना मित्र मंडळाने जागेवर ढोल वाजवणे बंद केले. अजान संपल्यानंतर पुन्हा दोनचा गजर सुरू झाला. शिवसेना मित्र मंडळाच्या या धार्मिक सामाजिक स्वरूपाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.