Nashik News : मद्यधुंद अवस्थेतील वैद्यकीय अधिकाऱ्याकडून गर्भवतीची हेळसांड! ग्रामस्थांची कारवाईची मागणी

Primary Health Center Building at Kapaleshwar.
Primary Health Center Building at Kapaleshwar. esakal
Updated on

Nashik News : सार्वजनिक आरोग्य विभाग एकीकडे गरोदर महिला, प्रसूती, आणि कुपोषणावर कोट्यवधींचा खर्च करत असताना ग्रामीण भागात मात्र याच आरोग्य यंत्रणेचे शिलेदाराकडून या मोहिमेला हरताळ फासताना दिसत आहेत.

२२ ऑगस्ट रोजी रात्री अकराला खडकी (ता. कळवण) येथील कल्पना भोये यांना त्यांच्या कुटुंबियांनी प्रसुतीसाठी कपालेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. (drunk doctor refused to admit pregnant women to health center nashik news)

बागलाण तालुक्यातील कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वीरेंद्र आवारे यांनी प्रसुतीसाठी दाखल झालेल्या गर्भवतीस आरोग्य केंद्रात दाखल करून न घेता डांगसौंदाणे येथील ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत हेळसांड केली. त्यामुळे संतप्त झालेल्या कपालेश्‍वर ग्रामस्थांनी याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

येथे मद्यधुंद अवस्थेत ड्यूटीवर असलेल्या डॉ. वीरेंद्र आवारे यांनी गर्भवतीस आरोग्य केंद्रात दाखल करून घेण्यास नकार देत डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.

यावेळी गर्भवतीच्या वडिलांनी व नातेवाईक यांनी विनंती करूनही दारुच्या नशेत असलेल्या डॉक्टर आणि त्याच्या एका जोडीदाराने सर्वांना रुग्णालयातून हाकलून दिले. यानंतर नातेवाईकांनी डांगसौंदाणे येथील ग्रामीण रुग्णालयात गाठले.

बुधवारी (ता.२३) सकाळी रात्री घडलेला सर्व प्रकार काकजी बागूल यांनी लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांना सांगितला. संतप्त ग्रामस्थांनी सरपंच मनोहर ठाकरे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. याठिकाणी डॉ.आवारी हे दारुच्या नशेतच असल्याचे सर्वांना दिसले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Primary Health Center Building at Kapaleshwar.
Onion : कांदा निर्यातीवर दहा वर्षांत वीस वेळा निर्बंध

यानंतर आदर्श गाव किकवारीचे केदा काकुळते आणि ग्रामस्थ यांनी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यास केंद्रातून हाकलून लावत घटनेची संपूर्ण माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी यांना देत अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य गोविंदा ठाकरे, सुरेश महाले, पोपट पवार, साहेबराव अहिरे, केशरबाई बागूल, उत्तम बागूल, तुषार बागूल, माधव ठाकरे, लहानू पवार, रूपाली बागूल उपस्थित होते.

पूर्णवेळ अधिकारी देण्याची मागणी

गेली अनेक वर्षे या रुग्णालयात असलेले डॉ. आवारी हे कायमच मद्येच्या नशेत राहत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यासंदर्भात अनेकवेळा वरिष्ठांकडे तक्रारी करूनही संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला यंत्रणेकडून पाठीशी घातले जात असल्याचा आरोप केला.

याठिकाणी असलेले दुसरे वैद्यकीय अधिकारी डॉ ज्ञानेशवर धनगे पाटील देखील कायम गैरहजर राहत असल्याने येथील आरोग्य सेवेचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे या रूग्णालयात पूर्णवेळ नवीन वैद्यकीय अधिकारी देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Primary Health Center Building at Kapaleshwar.
Nashik Crime: टेस्ट ड्राईव्हला नेलेली इलेक्ट्रिक कार घेऊन पसार

"संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्यावरील तक्रारी लक्षात घेता त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. रुग्णालयात रुग्णाची यापुढे हेळसांड होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली जाईल."- डॉ. हर्षल महाजन, तालुका वैद्यकीय अधिकारी

"कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्र आमच्या आदिवासी भागासाठी शोभेची वास्तू ठरत आहे. आरोग्य सेवा मिळत नसल्याने जनतेत नाराजी आहे. येथील वैद्यकीय अधिकारी आपल्या मर्जीने येतात आणि जातात. वरिष्ठांनी लक्ष न दिल्यास आरोग्य विभागाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल." -मनोहर ठाकरे, सरपंच कपालेश्वर

Primary Health Center Building at Kapaleshwar.
Nashik: नागोबालाही लागला कांद्याचा लळा..अन् जवळ गेलं तर काढला फणा..!!; पहा VIDEO

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.