Nashik Crime News : जन्मदात्या बापानेच केला मुलाचा खून

murder
murderesakal
Updated on

Nashik Crime News : दारूच्या नशेत जन्मदात्या बापाने मुलाच्या डोक्यात लाकडी दांडा टाकून त्याचा खून केल्याची धक्कादायक प्रकार (आनंदपूर, ता. बागलाण) येथे घडला आहे. (Drunk father killed son nashik crime news)

याप्रकरणी जायखेडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित बापास पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. राजेंद्र चव्हाण असे मृताचे नाव आहे. आनंदपूर येथील देवपूर पाड्यावर साहेबराव चव्हाण हे पत्नी व मुलगा राजेंद्र यांच्यासह राहतात.

साहेबराव त्यांचा मुलगा यांच्यात नेहमी छोट्यामोठ्या गोष्टीवरून भांडणे होत असतात. बुधवारी (ता.५) जिजाबाई चव्हाण (पत्नी) व नणंद लीलाबाई चव्हाण (नणंद) या सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी गेले असता साहेबराव चव्हाण व मुलगा राजेंद्र चव्हाण (वय ३१) हे दोघे घरीच होते.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

murder
Dhule Crime News : देशी गावठी कट्टा बाळगणारा जेरबंद; 5 रिकामी काडतुसे जप्त

गुरुवारी (ता.६) बाप-मुलामध्ये वाद झाला. वादाचे पर्यावरण हाणामारीत झाले. यावेळी दारूच्या नशेत असलेल्या साहेबराव चव्हाण यांनी लाकडी दांड्याने मुलाच्या डोक्यात जोरदार प्रहार केल्याने राजेंद्र जमिनीवर कोसळला. यावेळी जास्त रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान आनंदपूर येथील पोलिस पाटील दिलीप सोनवणे साहेबराव चव्हाण यांच्या घरावरून जात असताना संशयित घराच्या ओट्यावर रक्ताने माखलेल्या कपड्यावर दिसला असता दिलीप सोनवणे यांनी विचारपूस केली. साहेबराव यांनी मी माझ्या मुलाला मारल्याचे सांगितले. श्री. सोनवणे यांनी घरात जाऊन खात्री केल्यानंतर जायखेडा पोलीसात खबर दिली आहे.

जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करून पंचनामा केला. याप्रकरणी जायखेडा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

murder
Nashik Crime News : पावणेतीन कोटींचा गंडा घालणारा ‘बोलबच्चन’ सुशील जेरबंद! 5 दिवसांची कोठडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.