नाशिक : दारुच्या नशेत तरुणाचा निर्घृण खून, दगडाने ठेचले डोके

drunk young man brutally murdered by stoning nashik crime news
drunk young man brutally murdered by stoning nashik crime news Sakal
Updated on

दिंडोरी (जि. नाशिक) : सोमवार तालुक्यातील तळेगाव दिंडोरी (Talegaon Dindori) येथील दिपक जनार्दन जाधव (वय-३१) याचा अज्ञात व्यक्तीने दारुच्या नशेत दगडाने ठेचून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत दिंडोरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, रविवारी (ता. १९) रात्री दिपक घरात असताना अज्ञात व्यक्तीने फोन करून घराच्या बाहेर बोलावून घेतले. घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर प्राथमिक शाळेच्या समोरच्या रिकाम्या जागेत नाशिक-कळवण रस्त्यालगत असलेल्या खोल जागेत बाभळीच्या झाडात रात्री अकरा वाजेपर्यंत संशयित मित्रासोबत दारू पिऊन धिंगाणा घातला. त्यानंतर त्या अज्ञात व्यक्तीने दिपक याचे डोके दगडाने ठेचून त्याचा खून केला.

रात्री घरी आई कमल व पत्नी ज्योती यांनी शोधा शोध सुरू केला पण तो मिळून आला नाही. सोमवारी (ता. १९) सकाळी उठल्यावर शोध सुरू केला असताना घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या प्राथमिक शाळेसमोर झुडपात मृतदेह आढळून आला.

drunk young man brutally murdered by stoning nashik crime news
नाशिक : हुडहुडी भरली; तापमान १२ अंशांवर

आज सकाळी अकरा वाजता नाशिक येथून ठसे तज्ञ पथक बोलावून घटना स्थळी असलेले रक्ताने माखलेले तीन दगड, दारुचा रिकामा खंबा, घड्याळ, मोबाईल चे हेड फोन सापडले असून ठसे तज्ञ पथकाने त्याचे परिषण करून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे. दिपकचे वडील अपंग आहेत. तो गावातच एका कंपनीत कामाला जात असे .आई व पत्नी किराणा दुकान चालवतात. दरम्यान आज दुपारी दोन वाजता त्याचा मृतदेह दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले. सांयकाळी तळेगाव दिंडोरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.

drunk young man brutally murdered by stoning nashik crime news
नाशिक : मुख्याध्यापक, शिक्षकांना शिस्त लावा; सभासद आक्रमक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.