Nashik : दुबईच्‍या दांपत्‍याचे संतती स्‍वप्‍न नाशिकमध्ये पूर्ण

New Born Baby
New Born Babyesakal
Updated on

नाशिक : दुबईला राहणाऱ्या मराठी दांपत्याने (Marathi Couple) मूल होण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय रुग्‍णालयांमध्ये (International Hospitals) उपचार घेतले. या दांपत्‍याचे संतती प्राप्तीचे स्‍वप्‍न नाशिकला प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये (Progenesis Fertility Center) पूर्ण झाले. प्रारंभी योग्‍य चाचण्या केल्या. नंतर उपचाराची दिशा ठरवून पहिल्‍या प्रयत्‍नात यश आले. मातेने बालकाला जन्‍म दिला असून, दोन्‍ही सुदृढ आहेत, अशी माहिती व्यंधत्व विकार तज्ज्ञ डॉ. नरहरी मळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Dubais couples having child dream come true in Nashik news)

डॉ. मळगावकर म्‍हणाले, की राजाराम आणि प्रियांका खांडळ कामानिमित्त दुबईत स्‍थायिक आहेत. विवाह होऊन १५ वर्षे झाली, तरी मुलं होत नव्हते. लग्नानंतर काही वर्ष वाट पाहून मूल न झाल्याने जोडप्याने फर्टिलिटी ट्रीटमेंटचा निर्णय घेतला. प्रथम युएईमधील रुग्‍णालयात डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्यांनी आयव्‍हीएफ करण्याचा निर्णय घेतला. वारंवार प्रयत्‍नातून यश येत नसल्‍याने जोडप्‍याने नाशिक गाठले. येथील उपचारालाही प्रतिसाद मिळत नसल्‍याने दांपत्य खचून गेले. परिचितांच्‍या सांगण्यावरून विविध उपचार पद्धती घेतल्‍या. अखेर प्रियांका खांडळ यांच्या आईने नाशिकच्या प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरला भेट देण्याचा सल्‍ला दिला. रुग्‍णालयात पहिल्या दिवसापासून तज्ज्ञांची समुपदेशन सत्र, गरजांना अनुकूल असलेल्या उपचार पर्यायांबद्दल मार्गदर्शन केले. वजनाशी निगडित समस्‍येमुळे त्‍या गरोदर राहत नसल्‍याचे निदर्शनास आल्‍यानंतर त्‍यादृष्टीने यशस्‍वी उपचार केल्‍याचे डॉ. मळगावकर यांनी सांगितले.

New Born Baby
जुलैपासून डास आढळणाऱ्या घरांना दंड; साथ रोग प्रतिबंधाची तयारी

सहापैकी एका दांपत्‍याला वंधत्‍व

बदलती जीवनशैली व अन्‍य विविध कारणांनी वंधत्‍वाचे प्रमाण वाढत आहे. साधारणतः सहापैकी एक दांपत्‍याला वंधत्‍व असल्‍याचे निदर्शनास येत आहे. योग्‍य उपचाराद्वारे संतती प्राप्तीचे सुख प्राप्त करता येऊ शकते. यासंदर्भात व्यापक जनजागृती होण्याची आवश्‍यकता असल्‍याचे डॉ. मळगावकर यांनी सांगितले.

New Born Baby
दिंडोरीच्या ताराबाईंच्या संसाराला कष्टाचं थिगळं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.