Nashik: पोटहिस्से नसल्याने सरकारी मोजणीस अडथळा! देवळालीतील शेतकऱ्यांसह लक्ष्मण मंडाले यांचे शरद पवारांना साकडे

Laxman Mandala, Kondajimama Awad, Gokul Pingle and Shetkari giving a statement to Sharad Pawar.
Laxman Mandala, Kondajimama Awad, Gokul Pingle and Shetkari giving a statement to Sharad Pawar.esakal
Updated on

नाशिक : देवळालीगाव येथील विहीतगाव हे नाशिक महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर २०१५ नंतर महापालिकेने सिटीसर्वे लागू केला आहे. मात्र त्यामध्ये पोटहिस्से दर्शविलेले नसल्यामुळे सरकारी मोजणीत अडथळा येत आहे.

त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना निवेदन देऊन हा प्रश्न शाश्वत सोडवण्यासाठी साकडे घातले आहे. (Due to lack of allowances government counting hindered Laxman Mandalas tribute to Sharad Pawar along withfarmers of Deolali Nashik)

विहीतगाव हे १९८२ पर्यंत नाशिक रोड- देवळाली नगरपालिकेत समाविष्ट होते. शेतजमिनी गाव नकाशामध्ये सर्वे नंबरप्रमाणे नोंदी होत्या. त्या वेळी नकाशेपोटीचे भूमी अभिलेख मोजून मापून हद्द कायम करून मिळत असतं.

मात्र १९८२ मध्ये नाशिक महापालिका स्थापन झाल्यानंतर विहीतगाव हे महापालिकेत आले. २०१५ नंतर सिटी सर्वे लागू झाला. नाशिक भूमिअभिलेख विभागाने गावचे शेतजमिनीचे रेकॉर्ड हे सिटी सर्वे नंबर टाकून तयार केले.

मात्र शेतकऱ्यांच्या जमिनीचे पोटहिस्से दर्शविलेले नसल्यामुळे मोजणीमध्ये मोठ्या प्रमाणावर अडचण होत आहे. गावपातळीवर तलाठी कार्यालयात शेतजमिनीचे सातबारा उतारे नंबरप्रमाणे मिळतात.

त्यावर कुठलीही सिटी सर्वे नंबर नोंद टाकलेली नाही. भूमिअभिलेखात शेतजमिनी सिटी सर्वे नंबरप्रमाणे दर्शविलेले आहे. त्यामुळे पूर्वीचे पोटहिस्से समाविष्ट केलेले नाही. सध्या देवळाली मतदारसंघातील शेतकऱ्यांना शेतजमिनीच्या पोट विषयाची मोजणी करण्यासाठी संपूर्ण गटाची फी भरावी लागते.

Laxman Mandala, Kondajimama Awad, Gokul Pingle and Shetkari giving a statement to Sharad Pawar.
Maharashtra Politics: महायुतीतील घटक पक्षांची मन जुळणार; आता जिल्ह्याजिल्ह्यात राबवला जाणार हा उपक्रम

तरीदेखील पोटहिस्स्याची हद्द कायम करून मिळत नाही. त्यामुळे जमिनीचे वाटप व जमिनीचे व्यवहार करणे अडचणीचे झाले आहे. भाऊबंदकीचे वाद मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. यामुळे विहीतगाव येथील शेतकऱ्यांनी शरद पवार यांना साकडे घालून हा प्रश्न प्राधान्याने सोडवावा, अशी विनंती केली आहे.

या वेळी शरद पवार गटाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण मंडाले, संजय हंडोरे, योगेश हगवणे, शिवाजी हांडोरे, राहुल पाटील, जयराम हगवणे, तानाजी हगवणे, श्यामराव पाटील, बाळू हंडोरे, प्रमोद पाटील, पी. आर. कोठुळे, निवृत्ती कोठुळे, हिरामण कोठुळे, भरत हांडोरे, पुंजा गांगुर्डे, विष्णू जाधव, शिवाजी खांडेकर, दत्तू हगवणे, शांताराम हंडोरे यांच्यासह समस्त देवळाली मतदारसंघातील शेतकरी उपस्थित होते.

Laxman Mandala, Kondajimama Awad, Gokul Pingle and Shetkari giving a statement to Sharad Pawar.
Nashik Unseasonal Rain Damage: अवकाळी पावसाच्या फटक्यामुळे कांदा लागवडीसाठी एकराला 15 हजारांचा खर्च

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()