भर पावसात चितेला अग्नी द्यायचा कसा...? ताडपत्रीच्या आधाराने उरकला अंत्यविधी

आदिवासी अतिदुर्गम भागातील खेड्यापाड्यांना अजूनही स्मशानभूमीची प्रतिक्षा कायम आहे.
Latest marathi news
Latest marathi newsesakal
Updated on

सुरगाणा (जि. नाशिक) : 'सरणही थकले मरण पाहुनी..मरणानंतरही भोगाव्या लागतात नरक यातना...' या काही एखाद्या कवितेतील भावार्थ स्पष्ट करणाऱ्या ओळी नसून प्रत्यक्ष सुरगाणा तालुक्यातील वाघधोंड ग्रामपंचायतीमधील साबरदरा येथे स्मशानभूमी अभावी भरपावसात एका मृतदेहाच्या झालेल्या अवहेलनेची वस्तुस्थिती आहे. (Latest marathi news)

चितेला अग्नी द्यायचा कसा...?

साबरदरा येथे ८ जुलै रोजी एका वयोवृद्ध महिलेचे आकस्मिक निधन झाले. त्याचवेळी सकाळपासूनच संततधार पाऊस सुरु होता. या गावात अद्यापही स्मशानभूमीला शेड नसल्याने कुटुंबाने शेतातच अंत्यविधी उरकण्याचा निर्णय घेतला. अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांना सरण रचतांना चितेवर चक्क ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला. कसे बसे सरण रचल्यानंतर संततधार पावसामुळे चितेला अग्नी द्यायचा कसा? असा प्रश्न नागरिकांना पडला.

Latest marathi news
खरिपासाठी सौभाग्याचं लेणं गहाण! शेतकऱ्यांना पीककर्ज मिळेना

लाखोंचा निधी खर्च, सुविधा मात्र शुन्य

आदिवासी अतिदुर्गम भागातील खेड्यापाड्यांना अजूनही स्मशानभूमीची प्रतिक्षा करावी लागतेय हे न उलगडणारे कोडे आहे. आदिवासी भागात दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र अनेक गावात स्मशानभूमीपर्यंत रस्ता नसल्याने चिखलातून वाट काढावी लागते, तर काही ठिकाणी नदीतून कमरे एवढ्या पाण्यातून मृतदेह वाहून न्यावे लागतात. शेड नसल्याने उघड्यावर अंतिम संस्कार करण्यात येतात. अशा एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. वाघधोंड ग्रामपंचायतीत केवळ दोनच गावे समाविष्ट असून साबरदरा येथे अद्याप स्मशानभूमी शेड नाही.

ग्रामपंचायत वाघधोंड असून बंधारपाडा व वाघधोंड येथे स्मशानभूमीला शेड आहे, मात्र साबरदरा येथून त्याचे अंतर तीन किलोमीटर असल्याने तेथे प्रेत भर पावसात घेऊन जाता येत नाही. त्यामुळे येथील नागरिक गावातच शेतात अंत्यविधी करतात. कित्येकदा संततधार पावसामुळे मृतदेह अर्धेच जळतात. पुन्हा पाऊस उघडल्यावर लाकडे टाकावी लागतात.

Latest marathi news
Latest news | व्यसनाधीन वायरमनमुळे गाव अंधारात; कठोर कारवाईची मागणी

साबरदरा येथील स्मशानभूमी कहांडोळचोंड शेजारी कासूटन्याचा कुंड येथे असून तेथे जाण्यासाठी अद्यापही रस्ता नसल्याने विशेषतः पावसाळ्यात खुपच हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. हे ठिकाण नदीच्या काठावर असल्याने नदीला पूर असल्यास खूपच समस्यांना सामोरे जावे लागते.

"वाघधोंड ग्रामपंचायतीमध्ये साबरदरा व बंधारपाडा ही गावे आहेत. पैकी साबरदरा येथे स्मशानभूमी शेड उभारलेले नाही. त्यामुळे विशेषतः पावसाळ्यात आकस्मिक निधन झाले तर सरण रचलायला खुप अडचणी निर्माण होतात. शेड नसल्याने आम्ही नाईलाजाने शेतातच अंत्यविधी उरकण्याचा निर्णय घेतला. तरी जनसुविधा अथवा ठक्कर बाप्पा योजनेतून स्मशानभूमीचे शेड उभारून दिल्यास सोयीचे होईल." - वसंत भोये, मयताचा नातू.

Latest marathi news
जन्मदात्रीनेच घोटला मनोरुग्ण मुलाचा गळा; ढेकू येथील घटना

"स्मशानभूमी शेड जनसुविधा योजनेतून तसेच रोजगार हमी योजनेतून रस्ता मंजूर करण्यात आला आहे. जागा खाजगी मालकाची असल्याने कागद पत्रांची पुर्तता करून काम सुरु करण्यात येईल. स्मशानभूमीला शेड उभारून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल." - विलास अहिरराव, ग्रामसेवक वाघधोंड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.