Nashik News: सुविधांअभावी धार्मिक पर्यटनाचा दर्जा खालावला; समस्यांचा ससेमिरा

Crowd of tourists in Sulabh toilet in Tapovan and Piled grass at the Mela bus stand.
Crowd of tourists in Sulabh toilet in Tapovan and Piled grass at the Mela bus stand.
Updated on

Nashik News: धार्मिक पर्यटनाच्या अंगाने नाशिक सुजलाम सुफलाम असल्याचे मानले जात असले तरी प्रत्यक्षात वाईट परिस्थिती सुविधांबाबत दिसून येत आहे. रेल्वे, बस किंवा खासगी वाहनांच्या प्रवेशाने शहरात एन्ट्री केली, की समस्यांचा ससेमिरा सुरू होतो. तो शहरातून बाहेरपडेपर्यंत कायम राहतो.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर जागरूक नागरिकांनी धार्मिक पर्यटनाच्या अनुषंगाने ‘सकाळ’कडे व्यथा मांडल्या. आयटी कंपन्या, कारखाने लांब राहिले. धार्मिक पर्यटनासाठी नागरिक नाशिकमध्ये येतात. किमान त्या सुविधा तरी पुरवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. (Due to lack of facilities quality of religious tourism has deteriorated nashik news)

रेल्वेस्थानकावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी येतात. प्रथम रिक्षावाल्यांकडून त्यांना घेरले जाते. अव्वाच्या सव्वा दर आकारून त्यांना इच्छितस्थळी पोचविले जाते. प्रवासी रिक्षात न बसल्यास दमदाटीचे प्रकार होतात. रामतीर्थ, तपोवन, सोमेश्‍वर, श्री काळाराम मंदिर येथे आल्यानंतर दिशादर्शक फलक नसल्याने नेमके स्थान लक्षात येत नाही. मार्गदर्शन करण्यासाठी गाइड उपलब्ध होत नसल्याने लोकांना विचारूनच पुढचा प्रवास करावा लागतो.

पूजाविधी किंवा अन्य धार्मिक कार्यक्रम करायचे झाल्यास निश्‍चित माहिती नसल्याने फसवणुकीची शक्यता असते. गंगाघाट, तपोवन या भागात सुलभ शौचालयांची संख्या कमी असल्याने सीझनमध्ये सकाळच्या वेळी गर्दी होऊन वादाचे प्रकार घडतात. गंगाघाटावरील शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने नैसर्गिक विधी बाहेर करण्याची वेळ येते. वादाचे प्रसंग घडल्यानंतर पोलिसांना शोधण्याची वेळ येते.

अंघोळीची सोय नाही. सुरक्षेअभावी पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण असते. गंगाघाट परिसरात वाहने पार्किंगसाठी मोठी जागा आहे; परंतु पार्किंग नेमके कोण चालवते, याबाबत खुलासा होत नाही. परिणामी, वाहनचालकांना दमदाटीदेखील होते. परजिल्हा व परराज्यातील वाहने असल्यास त्यांना वाहतूक पोलिसांकडून आर्थिक तोशीस दिली जाते. अनेक ठिकाणी अस्वच्छता आढळून येते.

मध्यवर्ती बसस्थानकातील विस्कळितपणा.
मध्यवर्ती बसस्थानकातील विस्कळितपणा.esakal
Crowd of tourists in Sulabh toilet in Tapovan and Piled grass at the Mela bus stand.
Rain Update: पुढील 2 दिवस पावसाची शक्‍यता; उत्तर महाराष्ट्रासाठी ‘यलो अलर्ट’ जारी

"स्मार्टसिटी, क्वॉलिटी सिटी, सुंदर नाशिक अशा प्रकारचे विश्लेषण देऊन नाशिककरांची व पर्यटकांची दिशाभूल होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पर्यटकांना येथे वाहनतळ आहे व समोरच सकाळची विधी आटोपण्यासाठी एकदम चिवळ व दुर्गंधीयुक्त अशा जागेत हे सर्व उपलब्ध आहे. शहर किती सुंदर, स्वच्छ, स्मार्टसिटी किंवा क्वॉलिटी सिटी आहे हे यावरूनच लक्षात येते. इथे पुरुषांसाठी कपडे बदलण्याची नीट सोय नाही, तर महिलांचे विचारायलाच नको. एक नाशिककर म्हणून येणाऱ्या पाहुण्यांची गैरसोय बघून दुःख होते. पर्यटनाच्या या मूलभूत गरजांची योग्य अशी प्रशस्त सोय या ठिकाणी होणे गरजेचे आहे." - शेखर गायकवाड, आपलं पर्यावरण संस्था, नाशिक

पर्यटनासाठी काय हवे?

- रेल्वे व बसस्थानकावर पर्यटकांसाठी माहिती केंद्र

- महापालिकेने पर्यटनाची वेबसाइट विकसित करावी

- वेबसाइटवर सर्व प्रकारची माहिती, मोबाईल क्रमांकासह द्यावी

- पर्यटनस्थळे व तेथील सुविधांची माहिती

- प्रवासासाठी वाहनांची व्यवस्था

- पर्यटनस्थळावर सुरक्षा

- मनोरंजनाची साधने निर्माण करावी

Crowd of tourists in Sulabh toilet in Tapovan and Piled grass at the Mela bus stand.
Nashik Godavari News: गोदावरीची दुरवस्था करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई; महापालिका आयुक्तांच्या सूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.