NAFED Onion News : ‘नाफेड’च्या सहभागाच्या अभावामुळे शेतकऱ्यांकडून कांद्याची आवक कमी

NAFED Onion News
NAFED Onion Newsesakal
Updated on

Onion Market News : ‘नाफेड’साठी लागणाऱ्या गुणवत्तेचा कांदा आम्ही विकायला आणला; परंतु क्विंटलला दोन हजार ४१० रुपयांऐवजी दोन हजार १०० ते दोन हजार २०० रुपये भावावर समाधान मानावे लागले.

त्याबद्दलचा रोष शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. २५) पिंपळगाव, लासलगाव बाजार समितीत लिलावाला सुरवात झाल्यावर व्यक्त केला. लासलगावमध्ये पोलिस बंदोबस्तात कांद्याचे लिलाव झाले.

त्याचवेळी देवळ्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धग कायम राहिली असून, शुक्रवारी सकाळच्या सत्रात लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडत रास्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांकडून गोंधळाच्या परिस्थितीत शुक्रवारीही कमी कांदा विक्रीसाठी आला होता. (Due to lack of participation of NAFED supply of onion from farmers is less nashik news)

राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी ‘नाफेड’तर्फे येवल्यात कांद्याचे खरेदी केंद्र सुरू करण्याच्या सूचना ‘नाफेड'च्या अधिकाऱ्यांना दिल्या. मात्र, खरेदी केंद्र सुरू न झाल्याने येवल्यासह अंदरसूलमधील कांद्याचे लिलाव ठप्प राहिले. बाजार समिती आवारात शुकशुकाट होता.

जिल्ह्यातील बाजार समिती आवारात शुक्रवारी आवक झालेला कांदा क्विंटलमध्ये पुढीलप्रमाणे असून (कंसात क्विंटलभर कांद्याला सरासरी मिळालेला भाव रुपयांमध्ये दर्शवितो) : नाशिक- २ हजार ४१८ (२ हजार), लासलगाव- ४ हजार ७५२ (२ हजार १५०), मुंगसे- १० हजार ५०० (१ हजार ९५०), सिन्नर- १ हजार ७७० (१ हजार ९००), कळवण- ८ हजार ३०० (१ हजार ८००), चांदवड- २ हजार ४०० (१ हजार ९३०), मनमाड- साडेतीन हजार (१ हजार ९००), सटाणा- १४ हजार ४८५ (१ हजार ९५०), पिंपळगाव बसवंत- ७ हजार २०० (२ हजार १५०), देवळा- ४ हजार ३०० (१ हजार ९५०), उमराणे- ८ हजार ५०० (१ हजार ९००).

कांद्याच्या या भावाची स्थिती पाहता, ‘नाफेड'तर्फे क्विंटलला दोन हजार ४१० रुपये या भावाने खरेदी करण्याची तयारी दर्शवण्यात आली असली, तरीही प्रत्यक्षात सरासरी भाव शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र पाहावयास मिळते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NAFED Onion News
NAFED Onion Purchase : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये ‘नाफेड’कडून कांदा खरेदीला पाठ

कांदा खरेदीच्या अटी-शर्ती

‘नाफेड’तर्फे खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्यासाठी अटी-शर्तींचे फलक झळकले आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची छायाचित्रे आहेत. आधारकार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, सात-बारा उताऱ्यावर कांद्याची नोंद, हेक्टरी २८० क्विंटलपेक्षा अधिक कांदा घेणार नाही.

४५ मिलिमीटरच्या पुढे आकारमानाचा कांदा खरेदी केला जाईल, यासह कसला कांदा खरेदी करणार नाही, याचे स्पष्टीकरण फलकावर देण्यात आले आहे. अटी-शर्तींमुळे संतापलेल्या महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी पाच हजार रुपये क्विंटल भावाने कांद्याची खरेदी करायला हवी, अशी मागणी केली आहे.

"जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही कोणत्याही बाजार समितीत ‘नाफेड’ कांदा खरेदीसाठी आले नाही. अगोदर ४० टक्के निर्यात शुल्क लावत केंद्र सरकारने कांद्याचे भाव पाडले. अशात आता ‘नाफेड'ची शक्ती अदृश्‍य आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळावेत, असे केंद्र सरकारला वाटत असल्यास निर्यातशुल्क हटवावे. त्यामुळे कांद्याला किलोला ४० ते ५० रुपये भाव मिळेल. केंद्र सरकारने निर्यात शुल्क निर्णय मागे न घेतल्यास तीव्र असंतोष शेतकऱ्यांचा रस्त्यावर दिसेल." - संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

NAFED Onion News
Nashik Onion News : अफगाणिस्तानचा कांदा अमृतसरमध्ये; रस्त्याने 20 रुपये किलो पोच भावाने उपलब्ध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()