बिजोरसे (जि. नाशिक) : शेतकऱ्यांवर कायम संघर्ष करण्याची वेळ येत असते. कारण कोणतेही उत्पादन घेतले की त्याला भाव मिळेलच, असे कधी होत नाही. गेल्या महिनाभरापासून कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबाची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. थंडीमुळे लिंबांना फारशी मागणी नाही. त्यामुळे दरात घट झाली आहे. (due to Lemon Price Fall difficult to production cost of farmers nashik news)
हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?
लिंबू स्वस्त झाल्याने शेतकरी नाराज आहे. फळ बाजारात लिंबाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. लिंबाच्या दरात मोठी घट झाल्याने वाहतूक खर्चही फिटत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. लिंबू स्वस्त झाल्याने लोणचे उत्पादकांकडून लिंबाची खरेदी सुरू झाली आहे. घाऊक बाजारात एका लिंबाची विक्री ५० ते ६० पैसे दराने केली जात आहे. किरकोळ बाजारात एका लिंबाची विक्री १ रुपये दराने केली जात आहे. दर घटल्याने लोणचे उत्पादकांनी खरेदी सुरू केली असली तरी त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी नाराज झाले आहेत. वाहतूक खर्च, लागवड खर्च विचारात घेतल्यास लिंबांना मिळणाऱ्या अल्प दरामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
आज कसमादे पट्ट्यात लिंबाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. मालेगाव, नाशिक व सुरत येथे शेतकरी लिंबू विक्री करतात. बाजारात लिंबाच्या एका गोणीला प्रतवारीनुसार १०० ते २६० रुपये असा दर मिळत आहे.
कोणत्याही उत्पादनावर समाधानकारक दर मिळेल, याची शाश्वती नसून शेतकऱ्याने जगावे कसे, असा प्रश्न आज सर्वत्र शेतकऱ्यांना पडला आहे. कोणतेही सरकार आले तरी शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेता येत नाही. परिणामी, शेतकरी हवालदिल झाला आहे.
"सध्या लिंबांना मिळत असलेला दर विचारात घेतल्यास वाहतूक खर्च, मजुरांचा खर्च, लागवड खर्चही निघत नाही. लोणचे उत्पादक जेवढी जास्त खरेदी करतील तेवढा शेतकऱ्यांना फायदा होईल. पण तसे होत नाही. लिंबू नाशवंत असल्यामळे साठवणूक करता येत नाही. त्यामुळेच आर्थिक फटका बसत आहे." - महेंद्र देवरे, लिंबू उत्पादक, नामपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.