पिंपळगाव एमआयडीसीत २५ कोटींची उलाढाल ठप्प; ४० कंपन्यांना टाळे

मंदी व गत वर्षाच्या लॉकडाउनमधून कसेबसे सावरणाऱ्या पिंपळगाव समर्थ औद्योगिक वसाहतीतील उद्योगाला पुन्हा घरघर लागली आहे.
Lockdown
LockdownE-Sakal
Updated on

पिंपळगाव बसवंत : मंदी व गत वर्षाच्या लॉकडाउनमधून कसेबसे सावरणाऱ्या पिंपळगाव समर्थ औद्योगिक वसाहतीतील (Pimpalgaoan MIDC) उद्योगाला पुन्हा घरघर लागली आहे. दीड महिन्यापासून सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे (Lockdown) पिंपळगाव एमआयडीसीतील ४० उद्योगांना टाळे लागले आहे. हजाराहून अधिक कामगार बेरोजगार झाले आहेत. महिनाभरात २५ कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. कोरोनाच्या झळा उद्योगांना मोठ्या प्रमाणात बसत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. (Due to lockdown 40 industries in Pimpalgaon MIDC were shut down)

कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लावले. त्यामुळे पिंपळगाव औद्योगिक वसाहतीतील अत्यावश्‍यक उद्योग वगळता सर्व आस्थापना बंद केल्या. पिंपळगाव समर्थ औद्योगिक वसाहतीत ६५ उत्पादक कंपन्या आहेत. त्यात प्लॅस्टिक क्रेट, मल्चिंग पेपर, कागदी खोके, ड्रीप, ब्लोर, कीटकनाशक उत्पादक कंपन्या आहेत. त्यातील २० कंपन्या मंदी व गेल्या लॉकडाउनमुळे कर्जाच्या ओझ्याने कायमचे टाळे लावले. उर्वरित ४५ कंपन्यामध्ये पाच उद्योग वगळता उर्वरित ४० कंपन्यांमधील उत्पादन थांबले आहे.

हजार कर्मचारी बेरोजगार

समर्थ औद्योगिक वसाहतीत वर्षभरात सुमारे ३०० कोटींची उलाढाल होते. गेल्या तीन वर्षांपासून मंदी व कोरोनाने दृष्ट लावली आहे. रडतखडत उद्योग सुरू असताना पुन्हा टाळेबंदी आल्याने गेली दीड महिन्यात २५ कोटींचे अर्थकारण थांबले आहे. उद्योगासाठी बॅंकांकडून घेतलेले कर्जाचे हप्ते भरण्याच्या विवंचनेत उद्योजक आहेत. कंपन्या बंद असल्याने बाराशेपैकी एक हजार कर्मचाऱ्यांचा रोजगार गेला आहे. कंपन्यांचे काम ठप्प असल्याने एमआयडीसीत शुकशुकाट पसरला आहे.

Lockdown
Tauktae : नाशिक जिल्हा यंत्रणेचा सतर्कतेचा इशारा; आपत्तीकालीन स्थितीत 'हे' करा

विजेचा लपंडाव

विविध समस्यांनी एमआयडीसीतील उद्योजक त्रस्त आहेत. त्यात गेल्या चार दिवसांपासून विजेचा पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे सुरू असलेले पाच कंपन्यांना विजेचा लपंडाव दुष्काळात तेरावा महिना ठरतो आहे. वाणिज्य दराने वीजबिल भरूनही पुरवठा सुरळीत होत नसल्याने उद्योजक हैराण झाले आहेत.

पिंपळगावच्या औद्योगिक वसाहतीत कधी नव्हे एवढा शुकशुकाट आहे. टाळेबंदीमुळे एमआयडीसीचे अर्थकारण पूर्ण कोलमडले आहे. एक हजार कर्मचाऱ्यांचे हातचे काम गेले आहे.

-सुधाकर कापडी, संचालक, जे. के. पॉलिप्लास्ट, पिंपळगाव बसवंत

(Due to lockdown 40 industries in Pimpalgaon MIDC were shut down)

Lockdown
एक चमत्कार आणि आजींची आत्महत्येची मानसिकता क्षणार्धात बदलली!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.