कोरोनाची भीती, गैरसमजातून आदिवासी पट्ट्यात १४७ मृत्यू : आमदार बोरसे

पंचायत समितीच्या सभागृहात कोरोनासंदर्भात झालेल्या आरोग्य विभागाच्या बैठकीत आमदार बोरसे बोलत होते.
Dilip Borse MLA.
Dilip Borse MLA.Google
Updated on

सटाणा (जि. नाशिक) : कोरोनाची (Coronavirus) भीती व गैरसमजातून बाधित रुग्णांना वाळीत टाकण्याचे प्रकार तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यात (Triable Areas) घडत असल्याने गेल्या पंधरवड्यात १४७ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करीत आरोग्य विभागाचे प्रयत्न कमी पडत असल्याचा आरोप बागलाणचे आमदार दिलीप बोरसे (MLA Dilip Borase) यांनी सोमवारी (ता. १०) येथे केला. (due to misunderstanding and Fear of corona there are 147 deaths in tribal belt says MLA Borse)

आदिवासींमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे

पंचायत समितीच्या सभागृहात कोरोनासंदर्भात झालेल्या आरोग्य विभागाच्या बैठकीत आमदार बोरसे बोलत होते. ते म्हणाले, की बागलाणच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यासह देशी भागातील आदिवासी, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्तींमध्ये लसीकरणसंदर्भात गैरसमज पसारल्याने लसीकरण करण्यास विरोध होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्या भागातील नागरिक बधितांना वाळीत टाकत आहेत. वाळीत टाकण्याच्या भीतीने उपचाराअभावी आदिवासींमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. पहिल्या लाटेत आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाने बेफिकरी न बाळगता नियमांचे काटेकोर पालन केल्याने कोरोनाचा शिरकाव झाला नाही. दुसऱ्या लाटेत मात्र कोरोना चाचणी आणि लसीकरणाबाबत गैरसमज निर्माण झाल्याने हा परिसर हॉटस्पॉट झाला आहे. हा गैरसमज काढण्यासाठी प्रशासन कमी पडत असल्याने आमदार बोरसे यांनी नाराजी व्यक्त केली.

Dilip Borse MLA.
नाशिक शहर-जिल्ह्यात कडक लॉकडाउन; जाणून घ्या लॉकडाउनची नियमावली

सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना

प्रशासन याबाबत बेफिकीर राहिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. हे टाळण्यासाठी सुरवातीला जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी वाड्यापाड्यावर जाऊन जनजागृती करण्याबरोबरच लसीकरण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या. लसीकरणाबाबत गैरसमज दूर करण्यासाठी प्रथम सरपंच, सदस्य, पोलिसपाटील, सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना लसीकरण करण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या घरातील सदस्यांचे लसीकरण केले जाईल, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अहिरराव यांनी स्पष्ट केले. उपसभापती ज्योती अहिरे, शेतकरीमित्र बिंदूशेठ शर्मा, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, सहाय्यक गटविकास अधिकारी काथेपुरी, तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत अहिरराव, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, आदिवासी भागातील सरपंच उपस्थित होते.

(due to misunderstanding and Fear of corona there are 147 deaths in tribal belt says MLA Borse)

Dilip Borse MLA.
एलआयसीची विमा रक्कम देण्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र नियमांमध्ये शिथिलता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.