Nashik News: ऑनलाइन जन्म दाखल्यामुळे आधारकार्डची वणवण संपेना! गुरुजींच्या मागे शिक्षण विभागाचा ससेमिरा

Aadhaar card extraction camp started by Zilla Parishad primary school teachers at their own expense
Aadhaar card extraction camp started by Zilla Parishad primary school teachers at their own expenseesakal
Updated on

मालेगाव शहर : शाळेतील विद्यार्थ्यांची हजेरीपटावर नोंदणी झाली असली, तरी आधारकार्ड नसल्यामुळे सरल व यूडाएस या दोन्ही ठिकाणी विद्यार्थी ‘अपडेट' होत नाहीत.

हे शिक्षकपदासाठी अडचणीचे ठरत आहे. विद्यार्थी प्रवेशीत होऊन सहा महिने झाले, पण शिक्षकांची आधारकार्डाची वणवण संपेना अशी परिस्थिती झाली आहे. (Due to online birth certificate Aadhaar card does not end tension of Education Department behind teachers Nashik News)

आधारकार्डमुळे मोठ्या प्रमाणावर वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गरीब व वंचित घटकांतील पालकांची मुले आहेत. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी बाळाची ग्रामपंचायतीत जन्म नोंद केली नसल्याने, त्यांचा ऑनलाइन जन्म दाखला उपलब्ध होत नाही.

परिणामी, नवीन आधारकार्ड निघत नाही. ग्रामपंचायत नोंदी नसल्याने पालकांना आधारकार्डसाठी अडचणी जाणवत आहेत. ऑनलाइन दाखला मिळविण्याची प्रक्रिया वेळखाऊ व प्रचंड खर्चीक असल्याने पालक मेटाकुटीला आले आहेत.

आधारकार्डसाठी जुळवाजुळव करीत गुरूजी पदरमोड करून एकदाचा शिक्षण विभागाच्या प्रशासनाचा ससेमिरा थांबविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सध्या बहुतांश विद्यार्थी ऊसतोडणीसाठी पालकांच्यासोबत गेली आहेत.

काही विद्यार्थांचे आधारकार्ड गुरूजींनी तयार केले. पण नोंदणीकृत पावतीवर जन्मतारीख येत असली, तरी आधारावर दिसत नसल्याने ही तांत्रिक बाब डोकेदुखी झाली. त्यामुळे शिकवणे सोडून याच कामासाठी वर्गशिक्षकांना वेळ द्यावा लागतो.

जन्म दाखला अथवा ‘बोनाफाईड' मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने पूर्वीप्रमाणे गृहीत धरावे, अशी मागणी पुढे आली आहे. दरम्यान, मालेगाव शहरातील शाळांच्या आधारकार्ड अद्ययावत संबंधी मंगळवारी (ता.१९) मुख्याध्यापक शिबिर होत आहे.

Aadhaar card extraction camp started by Zilla Parishad primary school teachers at their own expense
Champa Shashthi: घोडा, काठी, ध्वज, पालखीची सवाद्य मिरवणूक; चंपाषष्ठीनिमित्त पेठ रोडला बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम

जिल्ह्यातील आधारकार्डची स्थिती

० अवैध- २१ हजार ८३३

० आधारकार्ड नसलेले- ३३ हजार ६१८

० प्रक्रियेमध्ये असलेले- १३ हजार ९७०

० एकूण विद्यार्थी- १३ लाख २ हजार ७४०

० आधारकार्ड असलेले विद्यार्थी- १२ लाख ६९ हजार १२२

"प्रशासन शंभर टक्के आधारकार्ड हवेत म्हणून सारखे पत्र पाठवत आहे. मात्र, अडचणी खूप आहेत. आधारकार्ड अभावी विद्यार्थी सरकारी योजनेपासून वंचित राहिल्यास शिक्षक जबाबदार धरण्यात येणार असल्याने पालकांचा व प्रशासनाचा रोष शिक्षकांना सहन करावा लागतो."

- भास्कर भामरे, जिल्हा परिषद शाळा, नाकोडा (ता. कळवण)

"आधारकार्डासाठी जन्म दाखल्याची केलेली सक्ती डोकेदुखी आहे. पालक कामांसाठी जातात. त्यांच्या मुलांच्या जन्माची नोंद कुठेही केलेली नसते. याचा अर्थ असा होत नाही, की मुले नाहीत. पालकांचे आधारकार्ड, मतदानकार्ड, ग्रामपंचायतीचे पत्र अथवा मुख्याध्यापकांचे पत्र त्यास ग्राह्य धरावे. जेणेकरून आधारकार्ड शंभर टक्के निघतील."

- सविता देवरे, शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा, टाकळी (ता.मालेगाव)

Aadhaar card extraction camp started by Zilla Parishad primary school teachers at their own expense
Nashik News: 22 लाखांसाठी शेतकऱ्यांचा ‘ठिय्या’! बाजार समितीला टाळे ठोकण्याचा इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.