Nashik News : कचऱ्यातील प्लॅस्टिकमुळे गाईंचे आरोग्य धोक्यात!

in Panchvati Cow eating plastic in garbage
in Panchvati Cow eating plastic in garbageesaka
Updated on

पंचवटी (जि. नाशिक) : शहर परिसरात पडणाऱ्या कचऱ्यावर गुजराण करणाऱ्या गायींचे प्रमाण मोठे आहे. पंचवटी परिसरातील ठिकठिकाणी फेकण्यात आलेल्या कचऱ्यात प्लॅस्टिक असते. रस्त्यावर फिरणाऱ्या गायींचे खाद्य अशाच कचऱ्याचा ढिगाऱ्यातून मिळत असल्याने गायी असा कचरा खातात. या कचऱ्यासोबत असलेले प्लॅस्टिक त्यांच्या पोटात जाते, यामुळे गाईंचे आरोग्य धोक्यात आले आहे. (Due to plastic in waste health of cows in danger Latest Marathi News)

अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम, २०००६ नुसार सरकारने महाराष्ट्रमध्ये प्लॅस्टिकचे उत्पादन, वापर, विक्री, साठवण, तसेच थर्माकोल इत्यादींच्या वापरावर पूर्ण बंदी घातली आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, प्लॅस्टिकपासून बनलेल्या ज्या वस्तूंचे विघटन होत नाही, अशा वस्तू वापरण्यास मनाई केली आहे.परंतु पंचवटी परिसरातील दिंडोरी रोडवरील चित्रकूट समोरील बाजूस, मायको दवाखाना समोरील बाजूस पादचारी मार्ग, अवधूतवाडी समोरील बाजूस पादचारी मार्ग, तसेच विद्युतनगर कोटालगत, पेठ रोडवरील पाटावर नेहमीच कचरा व त्यात प्लॅस्टिकच्या पिशव्यादेखील असतात.

दिंडोरी रोड, पेठ रोड परिसरात रस्त्यावर फिरणाऱ्या गाई या ठिकाणी कचऱ्यात अन्न शोधत त्याचे सेवन करतात. मात्र, त्यावेळी अन्नाऐवजी प्लॅस्टिकच्या पिशव्याच त्यांच्या पोटात जाऊन त्याचा गोळा तयार होतो. यामुळे गाईंचे व गुराढोरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

in Panchvati Cow eating plastic in garbage
Nashik News : रस्ते दुरुस्तींच्या निधीतून ‘लिफ्ट’चा घाट?; ZPचा वादग्रस्त निर्णय

बंदीबाबत कठोर भूमिका घेणे गरजेचे

कचरा उघड्यावर टाकणे अद्याप बंद झालेले नाही, त्यातच प्लॅस्टिकचा वापरही सुरूच आहे. त्यामुळे जनावरांच्या आरोग्याशी खेळ होत असून, पोटातील आतड्यांच्या हालचाली प्लॅस्टिक सेवनामुळे मंदावत आहेत. त्यामुळे प्रशासनाने उघड्यावरील कचरा आणि प्लॅस्टिक बंदीबाबत अधिक कठोर भूमिका घेणे गरजेचे बनले आहे.

प्लॅस्टिकचा गोळा गायींच्या पोटात तयार झाल्याने पचन क्रियेत अडथळा निर्माण होतो. तब्येत कमी होते. पोटफुगीची शक्यता असते. प्लॅस्टिकमुळे आजारी पडणाऱ्या जनावरांमध्ये गायींचे प्रमाण अधिक आहे. शहरातून प्लॅस्टिकची, तर ग्रामीण भागातून खिळे, तार, प्लॅस्टिकच्या धाग्यांची समस्या आहे.

in Panchvati Cow eating plastic in garbage
Nashik News : मिनीबसचे चाक डोक्यावरून गेल्याने अनोळखी युवक ठार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.