Nashik | विजेच्या लपंडावाने पाणी असून खोळंबा

due to Power outage MSEDCL obstructing  water supply in lasalgaon Nashik News
due to Power outage MSEDCL obstructing water supply in lasalgaon Nashik Newsesakal
Updated on

लासलगाव (जि. नाशिक) : लासलगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजना सुरळीत चालण्यात आता महावितरण कंपनीचा (MSEDCL) अडथळा येत असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी दिली. दरम्यान कारणे अनेक असली तरी लासलगावकरांच्या पाणीसमस्येवर (Water Crisis) ठोस तोडगा निघावा असे प्रयत्न होताना दिसत नसल्याने नागरिक अधिकच संतापले आहेत. एक्स्प्रेस फिडर असूनही वीजपुरवठा वारंवार खंडीत का केला जातो याचे उत्तर मात्र महावितरणकडे नाही. सध्याच्या पाणीटंचाईमध्ये खंडीत वीजपुरवठा हे एक प्रमुख कारण पुढे येत आहे.

महावितरणची ३३ केव्हीए लाईन ट्रिप झाल्याने पाईप लिकेज मोठ्या प्रमाणात होते. ही जलवाहिनी अनेक शेतकऱ्यांच्या बागेतून गेल्याने पाईप फुटल्यास संपूर्ण शेतात पाणी साचत असल्याने शेतकरी वर्गाचा रोष वाढत आहे. धरण उशाशी, कोरड घशाशी अशी अवस्था सध्या लासलगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेची झाल्याने वीजवितरण कंपनीकडून वीजपुरवठा खंडित होत असल्याने नांदूरमध्यमेश्वर धरणात मुबलक पाणी असूनही या योजनेच्या लाभार्थी गावांना गेल्या अनेक दिवसापासून भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. कडक उन्हाळ्यात ४० अंश तापमान आणि अनियमित पाणीपुरवठा यामुळे ग्रामपालिका प्रशासनासह नागरिकही हैराण झाले आहेत.

due to Power outage MSEDCL obstructing  water supply in lasalgaon Nashik News
पंचवटी विभागीय कार्यालयाकडून अतिक्रमण मोहीम | Nashik

पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मतदारसंघातील लासलगाव या मोठ्या गावी वीज वितरण कंपनीच्या अनास्थेमुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वीजपुरवठ्याअभावी समस्त लासलगावातील नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. जलवाहिनी लिकेजचे विघ्न दूर होत नाही तोच विजेच्या लपंडावाने पाणी असून त्याचा पुरवठा थांबलेला आहे. लासलगावला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूर-मध्यमेश्वर येथे सुरळीत पाणीपुरवठा व्हावा म्हणून एक्सप्रेस फिडर बसवले आहे. तरीदेखील दिवसातून अनेक वेळा लाईन ट्रीप होत असल्याने लासलगावला पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. या योजनेला एक्सप्रेस फिडर बसवले असल्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे कोणतीही कारण नाही, पण वीज वितरण अधिकारी वारंवार पुरवठा खंडीत करतात, त्यामुळे संपूर्ण योजनेचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो अशी माहिती ग्रामविकास अधिकारी पाटील यांनी दिली.

due to Power outage MSEDCL obstructing  water supply in lasalgaon Nashik News
Crime Alert | चारित्र्याचा संशयातून पतीने केली पत्नीची हत्या

"एक्सप्रेस फिडर बसवले असून तरीदेखील लाईन ट्रीप होत असल्याने लासलगावला पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे.वीज वितरण कंपनीचा फटका पाणी पुरवठ्यावर होत आहे.त्यामुळे या योजनेच्या लाभार्थी गावांना गेल्या अनेक दिवसापासून भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते"

- शरद पाटील, ग्रामविकास अधिकारी

"३३ केव्हीए चे आंतर जास्त असल्याने लाईन ट्रिप होण्याचे प्रमाण वाढले आहे तसेच आमच्या कडे किती वेळेस आणि किती कालावधीकरिता वीज पुरवठा बंद झाला आहे त्याची नोंद आहे."

- पी. एन. पाटील, सहाय्यक अभियंता, नांदूर मध्यमेश्‍वर

"भिषण पाणीटंचाईमुळे महिलांना मोर्चा कढावा लागला.परिस्थितीत सुधारणा होईल असे वाटत असतानाच विज वितरण कंपनीकडून गुरुवार पासुन भारनियमन लादले त्यामुळे पुंन्हा पाणीटंचाई निर्माण होईल का अशी भिती वाटु लागली आहे.सर्व सामांन्याचे अतोनात हाल होत आहे."

-कावेरी पालवे, गृहिणी लासलगाव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()