Nashik News : पाऊस लांबल्याने जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या

Due to prolonged rains sowing was disrupted in district nashik news
Due to prolonged rains sowing was disrupted in district nashik newsesakal
Updated on

Nashik News : मॉन्सून पर्वास सुरवात होऊन दहा ते बारा दिवसाचा कालावधी उलटला असला तरी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही. बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाऊस लांबत असल्याने नाशिक जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या आहेत.

जून महिन्यातील सरासरी पर्जन्यमानापैकी एकाही तालुक्यात ५० टक्के एवढा पाऊस झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्यामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता आहे. (Due to prolonged rains sowing was disrupted in district nashik news)

शेतकऱ्यांनी खरीप पिकासाठी शेतीची मशागत करून ठेवली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी बियाणे, खते देखील खरेदी केले आहेत. मात्र पाऊस रोज गुंगारा देत आहे. नाशिक जिल्ह्याचे जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान ९३.० मिलिमीटर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत फक्त सरासरी १८.९ मिलिमीटर एवढाच पाऊस झालेला आहे. गेल्या वर्षी या तारखेपर्यंत ५०.४ मिलिमीटर एवढा पाऊस झाला होता. पाऊस लांबल्याने या वर्षाचा खरीप हंगाम देखील लांबणीवर पडणार आहे.

गेल्या वर्षी जिल्ह्यातील इगतपुरी, येवला व त्रंबकेश्‍वर वगळता सर्व तालुक्यात १७ जूनपर्यंत दमदार पाऊस झाला होता. त्यामुळे जूनअखेर जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पेरण्यांची कामे वेगाने सुरु होती. यावर्षी नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, पेठ, येवला, चांदवड या तालुक्यात तर नाममात्र पाऊस झाला आहे.

जूनच्या सरासरीच्या तुलनेने कळवण, मालेगाव, बागलाण, देवळाली या चार तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. पाऊस लांबल्याने मका, बाजरी, कपाशी, भात आदी प्रमुख पिकांची पेरणी खोळंबल्याने शेतमजुरांनाही पुरेसा रोजगार मिळत नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Due to prolonged rains sowing was disrupted in district nashik news
Nashik Agriculture News : जिल्ह्यात 1 लाख टन खतसाठा पडून; बियाणे खरेदीकडेही शेतकऱ्यांनी फिरविली पाठ

शेतकऱ्यांसह सर्वच घटकांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. २५ जूननंतर पाऊस येईल असा अंदाज वर्तविला जात असल्याने या वर्षी पेरण्या जुलैमध्येच होण्याची शक्यता आहे. जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

तालुका - जूनचे सरासररी पर्जन्यमान (मिलीमीटर) - आतापर्यंत झालेला पाऊस (मिलीमीटर)

मालेगाव - ५६.६ - २८.३

बागलाण - ५७.४ - २५.६

कळवण - ७५.३ - ४७.८

नांदगाव - ६१.३ - १९.६

सुरगाणा - १४४.५ - २१.८

नाशिक - ८२.१ - ५.१

Due to prolonged rains sowing was disrupted in district nashik news
JEE NEET Admission : खुशखबर! ग्रामीण विद्यार्थ्यांना जेईई- नीटची मोफत संधी; खर्च ZP करणार

दिंडोरी - ७०.४ - १२.६

इगतपुरी - २६४.४ - ११.०

पेठ - १५६.५ - १३.८

निफाड - ५४.७ - १६.९

सिन्नर - ६६.१ - १५.९

येवला - ६१.१ - ९.४

चांदवड - ६७.५- ५.३

त्रंबकेश्‍वर - १६९.४ - ३०.९

देवळाली - ५५.३- २६.८

नाशिक जिल्हा - ९३.० - १८.९

Due to prolonged rains sowing was disrupted in district nashik news
Nashik 11th Admission : विज्ञानकडे ओढा, कला, वाणिज्यला मात्र प्रतीक्षा! अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.