Nashik : पाऊस, पितृपक्षामुळे सर्वच भाज्यांचे दर तेजीत

vegetable price hike
vegetable price hikeesakal
Updated on

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेने पालेभाज्यांसह अन्य भाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम पितृपक्षात भाजीपाल्याच्या आवकेवर झाला आहे. (Due to rain Pitrupaksha prices of all vegetables rate hike Nashik Latest Marathi News)

त्यामुळे पालेभाज्यांसह सर्वच प्रकारच्या भाज्यांना अक्षरशः सोन्याचे मोल आले आहे. पितृपक्षात मेथी, गवार, डांगर, आळूची भाजी यांचे नैवेद्य व भोजनात मोठे महत्त्व आहे. त्यामुळे या काळात या भाज्यांना मोठी मागणी असते.

मात्र मागणीच्या तुलनेत बाजार समितीतील आवकेत पन्नास टक्के घट झाल्याने सर्वच प्रकारच्या भाज्यांच्या दराने तेजी गाठली आहे. किलोभर गावठी गवारसाठी चक्क दोनशे रुपये मोजावे लागत आहेत. मेथीच्या व कोथिंबिरीच्या जुडीने पन्नाशी ओलांडली असून, एरवी वीस तीस रुपये किलो दराने उपलब्ध असलेल्या डांगरानेही ऐंशी रुपयांचा भाव गाठला आहे.

vegetable price hike
Nashik : करवसुलीसाठी NMC दसऱ्यानंतर वाजवणार ढोल

किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर-

गवार १६० ते २०० रुपये किलो (गावठी)

भेंडी ५० रुपये. किलो

मेथीची जुडी ४० ते ५० रुपये

कोथिंबीर २० ते ३० रुपये (लहान जुडी)

गिलके ६० ते ८० रुपये किलो.

आळूची पाने २० रुपयात पाच

टोमॅटो ४० रुपये किलो.

"गणपती स्थापनेपासून वाढलेल्या भाज्यांच्या दरांत आता पुन्हा मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आम्हा महिलांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे." - स्मिता पोरजे, गृहिणी

vegetable price hike
‘ऊर्ध्व गोदावरी’साठी 1 हजार 498 कोटींना मान्यता; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()