नाशिक : राज्यातील अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम परीक्षांवर झाला आहे. शुक्रवारी (ता.३) होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करत असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सूचनापत्र जारी केले आहे.
परीक्षेचे फेरनियोजन केले जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळातर्फे स्पष्ट केले आहे. (Due to staff strike todays scheduled exam canceled by SPPU university Nashik News)
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
विद्यापीठातर्फे जारी केलेल्या सूचनापत्रात म्हटले आहे, की विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार शुक्रवारपासून राज्यातील अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांनी बेमुदत संप पुकारला आहे.
सदर संपाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या ऑक्टोबर, २०२२ सत्रामधील चारही विद्याशाखेतर्गत येणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांच्या शुक्रवारी आयोजित सर्व परीक्षांचे फेरनियोजन करण्यात येत आहे. सदरच्या फेरनियोजनाबाबत सर्व संबंधितांना यथावकाश कळविण्यात येईल.
प्राचार्य, महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी यांनी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी व पालक यांना आपल्या स्तरावरून सूचित करावे, असे कळविले आहे. दरम्यान संपावर तोडगा न निघाल्यास पुढील परिक्षा प्रभावित होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.