पंचवटी (नाशिक) : शासनाने श्रावण महिन्यातही मंदिरांची कवाडे उघडण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे हिरमोड झालेल्या शिवभक्तांनी उघड्यावरील किंवा छोट्या मंदिरांमध्ये गर्दी करत कोरोनापासून मुक्तीसाठी भगवान शंकराला साकडे घातले.
श्रावण व त्यातला सोमवार म्हटले लाखो शिवभक्त शिवनामाच्या गजरात तल्लीन होतात. याकाळात पंचवटीतील शिवमंदिरांसह अन्य छोट्या मोठ्या मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी उसळते. याकाळात नाशिककरांचे श्रद्धास्थान असलेल्या कपालेश्वर मंदिराच्या आवारात तर पाय ठेवायलाही जागा नसते. परंतु गरवर्षीप्रमाणेच यंदाही देऊळबंदीच कायम असल्याने अनेकांचा हिरमोड झाला. त्यामुळे भाविकांनी गंगाघाटावरील रोकडोबा मंदिरासमोरील शिवलिंगासह रामकुंडावरील बाणेश्वर, नीळकंठेश्वर महादेव, नारोशंकर, तीळभांडेश्वर, सिद्धेश्वर आदी बंद मंदिराबाहे मोठी गर्दी केली होती. कपालेश्वर, सोमेश्वर महादेव ही मंदिरे भाविकांसाठी बंदच असल्याने भाविकांनी छोट्या मंदिराबाहेर दर्शनासाठी गर्दी केली होती. श्रावणी सोमवारी कपालेश्वराचा पालखी सोहळा परिसरात आयोजित केला जातो. परंतु गेल्या वर्षीपासून हा सोहळा मंदिराच्या आवारातच पार पडत आहे.
प्रसादवाटपही बंदच
श्रावणी सोमवार म्हटले की, अनेकजण गंगाघाटावर देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांना केळी, राजगि-याचा लाडू, चिक्की, खिचडी आदी उपवासाच्या पदार्थांचे वाटप करतात. परंतु कपालेश्वर देवस्थानकडे जाणारे तिन्ही मार्ग बॅरीकेटिंग लावून बंद करण्यात आल्याने तसेच पोलिस याठिकाणी थांबू देत नसल्याने भाविकांसाठी प्रसाद वाटप करणारेही यावर्षी फिरकले नाहीत.
सोमेश्वर, कपालेश्वरी चोख बंदोबस्त
नाशिककरांचे मोठे श्रद्धास्थान असलेल्या कपालेश्वर मंदिरासह सोमेश्वर महादेव मंदिर सलग दुस-या भाविकांसाठी बंदच होते. निवडक विश्वस्त व पुजारीवर्गाच्या उपस्थितीत पूजाविधी पार पडला. भाविकांनी दर्शनासाठी आगळीक करू नये म्हणून यादोन्ही ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कपालेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी तीन मार्ग उपलब्ध आहेत. पोलिसांनी तिन्ही ठिकाणी बॅरीकेटीगं केले होते. रामकुंडाकडे जाणा-या सर्वच रस्त्यांवर पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. सोमेश्वर मंदिरात जाणारे रस्ते पोलिसांनी बंदीस्त केले होते. याठिकाणीही मोठा पोलिस बंदोबस्त होता.
नाशिकमधील स्थिती
१) रामकुंडाकडे जाणारे रस्ते बॅरीकेटींगद्वारे बंदीस्त.
२) कपालेश्वर मंदिराकडे जाणा-या तिन्ही ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त.
३) सोमेश्वर मंदिराकडे जाण्यास पोलिसांचा मज्जाव.
४) उघड्यावरील शिवलिंगांवर बेलाच्या पानांसह दुग्धाभिषेक.
५) शिवमंदिरांवर आकर्षक सजावट.
६) कपालेश्वर पालखी सोहळा यंदाही आवारातच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.