Unseasonal Rain : आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल; सुरगाणा तालुक्यात अवकाळीमुळे चिंता!

Damage to Baburao Gavit's mangoes.
Damage to Baburao Gavit's mangoes.esakal
Updated on

सुरगाणा (जि. नाशिक) : दोन ते चार दिवसापासूनच तालुक्यात पावसाचे वातावरण तयार झाले होते. सुरगाणा शहरात होळीनिमित्त दोन दिवस यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. (due to unseasonal rains mango crop farmers in worry surgana nashik)

दुपारी अडीचच्या दरम्यान यात्रेत जोरदार वादळ, विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी आल्याने यात्रेकरूंचा हिरमोड होऊन एकच धावपळ सुरू झाली. व्यावसायिक, व्यापारी, पाळणा, खेळणी विक्रेते, तमाशा कलावंतांचा फड यांची धावपळ झाली.

अनेकांचा खरेदी केलेला माल, साहित्य पावसात भिजून नुकसान झाले. दुपारी तीनपासून तर रात्री साडेनऊपर्यंत पावसाची रिपरिप सुरुच होती. अवकाळी पावसामुळे होळी लवकरच पेटविल्याने होळीच्या आनंदावर पावसाचे विरजण पडल्याने अनेक हौशी नाराज झाले आहेत.

या अवकाळी पावसाळ्यामुळे तालुक्यातील आंबा शेतकरी धास्तावले असून जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने आंबा मोहर झडल्याने तसेच कच्चा मोहर आतील कै-या पडल्याने अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यात आंब्याचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

Damage to Baburao Gavit's mangoes.
Nashik News: HALला मिळाले 70 ट्रेनर विमानांचे काम

येथील आंबा गत वर्षी परदेशात निर्यात झाला होता. अत्यंत चविष्ट, टिकाऊ व कोरडवाहू शेती जमिनीत रसायन मुक्त सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या आंब्याला खूप मागणी आहे. या वादळामुळे ठिकठिकाणी फांद्या मोडून पडल्याने आंबा फळबागधारक शेतकरी हवालदिल झाला आहे.

आंबा फळबाग विमा प्रतिनिधी सुरेश महाले यांनी सकाळ प्रतिनिधीस सांगितले की, तालुक्यातील अळीवदांड येथील देविदास महाले, बाबूराव गावित, तात्या महाले, रघुनाथ महाले, उत्तम गावित यांचे तर बा-हे, गडगा, सर्कलपाडा, हट्टीपाडा, झगडपाडा, मनखेड, म्हैसमाळ, आवळपाडा, ठाणगाव, सुकतळे, केळावण, गडगा, गोपाळपूर, कचूरपाडा, अंबोडे, उंडओहळ बाऱ्हे,

वाघनखी या भागातील आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. आंबा उत्पादक शेतकरी जयप्रकाश महाले, नारायण महाले, सुभाष महाले, योगीराज धूम, रघुनाथ महाले, जयराम धूम, यशवंत जाधव, देविदास धूम, चंदर पाडवी, चिंतामण हन, पंडित देशमुख, बाबूराव गावित, केशव पालवी आदी शेतक-यांचे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, वैरण, जनावरांचा चारा, गवत आदींचे नुकसान झाले आहे.

Damage to Baburao Gavit's mangoes.
Nashik News : जिल्ह्यात सव्वादोन हजार बालकांना श्‍वसनसंबंधी आजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()