Nashik Unseasonal Rain Damage: अवकाळी पावसामुळे एकावेळी कांदा लागवडीचा ताण! मजुरांच्याअभावामुळे शेतकरी मेटाकुटीस

Damaged onion plants due to delay in planting due to unseasonal rains and labor shortage.
Damaged onion plants due to delay in planting due to unseasonal rains and labor shortage.esakal
Updated on

अभोणा : येथील परिसरात गेल्या महिन्यात आणि आठवडाभरापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा लागवडीस उशीर झाला. एकावेळी कांदा लागवड करावी लागत असल्याने मजुरांच्या टंचाईमुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.

तालुक्याचा पश्‍चिम पट्टा कांद्याचे आगार म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या वर्षापासून अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे डोळ्यादेखत कांदे सडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. (Due to unseasonal rains onion cultivation stressed at one time Farmers lost their jobs due to lack of labour nashik)

नवीन कांद्याकडून यंदा शेतकऱ्यांच्या अपेक्षा असल्याने लागवडीच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र अवकाळीच्या तडाख्याने गेल्यावर्षीची पुनरावृत्ती होते की काय? असा प्रश्‍न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

अवकाळी पावसाने लागवडीसाठी तयार केलेल्या शेतात पुन्हा पाणी तुंबल्याने शेत नव्याने तयार करण्यासाठी उशीर झाला. अवकाळी पावसाच्या अगोदर ज्यांनी कांदा लागवडीसाठी मजुरांना ठेका दिला, त्यांची लागवड अवकाळीने लांबवली.

आता परिसरात एकावेळी कांदा लागवड सुरू झाली आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शिवाय मजुरांची ने-आण करण्यासाठीचे भाडे वेगळे द्यावे लागते. वेळेची गरज म्हणून नाइलाजाने शेतकऱ्यांना लागवडीचा ठेका द्यावा लागत आहे.

Damaged onion plants due to delay in planting due to unseasonal rains and labor shortage.
NMC News: महापालिका बांधकाम विभागात नियमांची ऐशीतैशी! सहाय्यक कनिष्ठ अभियंत्यांकडून 20 कोटीचे कोटेशन मंजूर

त्यामुळे मजूर, मजुरीचे ठेकेदार व वाहतूकदार यांचे ‘अच्छे दिन', तर बुरशीजन्य रोगांवर अतिरिक्त फवारणी, महागडी खते, शेत तयार करण्याचा दुबार खर्च व मजुरांचा वाढीव खर्च यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले आहे.

अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकडून मजूर व ठेकेदारांनी मजुरीची अवास्तव मागणी करू नये, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

"अवकाळी पावसाच्या अगोदर व नंतरची कांदा लागवड पाऊस आणि खराब वातावरणामुळे लांबली. त्यामुळे एकावेळी लागवड सुरू झाल्याने मजुरांची टंचाई भासू लागली आहे. कांदा मुख्य पीक झाल्याने क्षेत्र वाढत गेले. शेतकऱ्यांनी कांद्याचे क्षेत्र कमी करून भाजीपाला व इतर पिकांचे योग्य व्यवस्थापन केल्यास अशा समस्या कमी होतील."

- पंडित वाघ, कांदा उत्पादक, बार्डे (ता.कळवण)

Damaged onion plants due to delay in planting due to unseasonal rains and labor shortage.
Nashik News: बागलाणसाठी 311 कोटींचा निधी मंजूर : दिलीप बोरसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.