नाशिक : आधीच घशाला कोरड त्यात टॅंकरचीही 2-2 दिवस दांडी

Crisis of water
Crisis of water esakal
Updated on

चांदवड (जि. नाशिक) : आधीच घशाला कोरड त्यातच टॅंकरचीही (Water tanker) दोन दोन दिवस दांडी. त्यामुळे चांदवड तालुक्यातील पाच गावे व सहा वाड्यांच्या पाण्याचा प्रश्र्न अधिक संवेदनशील (Sensitive) झाला आहे. एकीकडे पाण्यावाचून या गावांतील हजारो नागरिकांना पाण्याशिवाय दिवस ढकलावा लागत आहे, तर दुसरीकडे टॅंकरने खेप केलेली नसतानाही टॅंकरने खेप टाकली, असे दाखवून बिले सादर केली जात असल्याचे समजते. (due to water scarcity thirst of villages in Chandwad taluka became sensitive issue Nashik News)

तालुक्यातील दरेगाव येथे रोजच्या तीन खेपा, कानडगावला रोज दोन खेपा, कातरवाडीला रोज एक खेप, निमोण येथील सप्तशृंगी वस्ती दोन दिवसाआड एक खेप, धनदाई वस्ती दोन दिवसाआड एक खेप, चारणेवस्ती दोन दिवसाआड एक खेप, परसूलला दररोज दोन खेपा, गंगावे येथील नरोटे वस्तीवर दोन दिवसाआड एक खेप आदी पाच गावे व सहा वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा मंजूर आहे. याप्रमाणे खेपा झाल्या नाही, तरी टॅंकर चालक संबंधित गावांतील महिलांच्या रोज खेपा झाल्या, अशा सह्या घेऊन टाकतात. अन् बिले सादर केली जातात. प्रशासनही याकडे गंभीरपणे लक्ष देत नाही. काही ठिकाणी तर रजिस्टरवर ग्रामसेवकांच्या सह्या नंतर घेतल्या जातात. या सर्व प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, तसेच नियमित टॅंकरने पाणीपुरवठा व्हायला हवा, अशी मागणी संबंधित गावांतील नागरिकांकडून होत आहे.

Crisis of water
यंदा चटकदार लोणच्याला महागाईची झळ; गृहिणींची लोणचे तयार करण्यासाठी लगबग

दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाइपलाइन फुटली असून, चांदवड येथील जलकुंभातच पाणी नसल्याने टॅंकर भरून मिळत नसल्याचे पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे. असे असले तरी न केलेल्या खेपांचे बिल कसे सादर होते, हा प्रश्र्न कायम आहे.

Crisis of water
NMC विद्यार्थ्यांना मिळणार 2 गणवेश; 1 कोटी 20 लाखांचा निधी प्राप्त

"चार ते पाच दिवसांपासून पाणी नाही. माझे वय झाले आहे. तरीही मला रानावनात जाऊन पाणी आणावे लागत आहे. रोज पाणी मिळावे, ही अपेक्षा आहे." - सखुबाई रामभाऊ फड, निमोण

"दोन दिवसांपासून आमच्या गावात टॅंकरने पाणीपुरवठा झालेला नाही. दोन खेपा मंजूर असून, एकच खेप येते. त्यामुळे नागरिकांची तहान भागत नाही."

- बापू लांडे, सामाजिक कार्यकर्ते, कानडगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()