नाशिक : करंजाडनजीक डंपर व बसचा अपघात; प्रवासी सुखरूप 

ST Bus accident
ST Bus accidentesakal
Updated on

अंबासन (जि.नाशिक) : विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील करंजाड ताहाराबाद रस्त्यावर परिवहन महामंडळाची बस आणि डंपरचा अपघात झाला. बसमधून ४४ प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही मात्र बसचे किरकोळ नुकसान झाले आहे. बसचालकाने जायखेडा पोलिस ठाण्यात अपघाताची तक्रार दाखल केली आहे.

चालकाच्या प्रसंगावधानाने बचावले प्रवासी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस (क्र.एमएच.१३,सीयू.८४८७) ४४ प्रवासी घेवून नाशिकहून नंदुरबारच्या दिशेने जात असताना करंजाड ताहाराबाद रस्त्यावर बसच्या पुढे ताहाराबादच्या दिशेने जात असलेला रेती वाहतूक करणारा डंपर (क्र.एमएच.१५,एफक्यू.०२४९) चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने बस डंपरच्या पाठीमागून धडकली. यात बसचालकाने राखलेल्या प्रसंगावधानातून बसमधील प्रवासी मोठ्या अपघातापासून थोडक्यात बचावले. बसचे मात्र काही प्रमाणात नुकसान झाले असून पुढील किरकोळ काचेला तडा गेला आहे. अपघातानंतर संबंधित डंपर चालक व क्लीनर फरार झाले आहे. बसचालक आण्णा भोजू जाधव (रा.पळसे, ता.जि.नाशिक) यांनी जायखेडा पोलिस ठाण्यात अपघाताची तक्रार दाखल केली. जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, उपनिरीक्षक नवनाथ रसाळ व हवालदार निकेश कोळी घटनास्थळी दाखल होत पाहणी करून पंचनामा केला. अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनानुसार उपनिरीक्षक नवनाथ रसाळ करीत आहेत.

ST Bus accident
संपामुळे ST बसेसच्या मेटेनन्स खर्चात वाढ; महामंडळाला फटका

रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

ताहराबाद सटाणा रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून कासव गतीने काम सुरू असून या रस्त्यावरून शेकडो वाहने ये-जा करीत असतात. रस्त्यावरील कामामुळे धुळीचे साम्राज्य पसरत असून याकडे संबंधित विभागाने लक्ष घालून रस्त्यावरील काम प्रगतीपथावर करून वाहनांसाठी सुरळीत करावीत अशी मागणी वाहनचालकांसह नागरिकांकडून होत आहे. दरम्यान रस्त्यावरील धुळीमुळे काठावरील शेतीपिकांचे अतोनात नुकसान होत असल्याचे शेतक-यांत संताप व्यक्त होत आहे.

ST Bus accident
पेट्रोल पंपाचा पाईप पारदर्शी होणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.