शेणखताला सोन्याचा भाव; 26 हजार रूपये प्रतिट्रक

Dung Manure price hike 26 thousand rupees per truck Nashik News
Dung Manure price hike 26 thousand rupees per truck Nashik Newsesakal
Updated on

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : द्राक्ष काढणीने वेग घेतला असून, हंगाम अंतिम टप्प्यात आहे. खरड छाटणीनंतर द्राक्षांच्या (Grapes) झाडांना शेणखत (Dung Manure) टाकण्याची लगबग सुरू आहे. सध्या याच शेणखताला सोन्याचा भाव आला आहे. शेणखताच्या एका ट्रकला (Truck) २६ हजार रुपये मोजावे लागत आहेत. नाशिकहून भाजीपाला घेऊन जाणारे ट्रक मुंबईतून शेणखत भरून आणतात. पंधरा दिवसांत नाशिक जिल्ह्यात वीस हजारांहून अधिक ट्रक शेणखत द्राक्षबागासाठी टाकण्यात आले.

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत घसरला आहे. उत्पादन खर्च वाढून दर्जा घसरल्याने शेतकऱ्यांना नव्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे शेतकरी पुन्हा शेणखताकडे वळला आहे. मुंबईच्या तबेल्यामधून येणाऱ्या शेणखतांचे दर यंदा विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. जिल्ह्यातील दोन लाख एकर क्षेत्रावर द्राक्षबागा विस्तारल्या आहेत. द्राक्ष हंगाम अंतिम चरणात असून काढणी झालेल्या बागांमध्ये खरड छाटणी सुरू आहे. छाटणीनंतर शेणखताची मात्रा द्यावी लागते. नाशिक जिल्ह्यात पशुधऩाचे प्रमाण कमी झाल्याने मुंबईच्या तबेल्यातून शेणखत घ्यावे लागते.

Dung Manure price hike 26 thousand rupees per truck Nashik News
ईदच्या बोनसनंतर खरेदीला लागतील ‘चारचॉंद’; विक्रमी उलाढालीची शक्यता

शेणखत महाग
गेल्या वर्षापर्यत २० ते २२ हजार रुपये प्रतिट्रक असा शेणखताला भाव होता. आता यात पाच ते सहा हजारांनी दर वाढलाआहे. शेणखताला तब्बल २६ हजार रुपये प्रतिट्रक असा दर मिळत आहे. वाढती मागणी व पुरवठा कमी झाल्याने त्यात डिझेलचे दर शंभर रुपये प्रतिलिटरच्या पुढे गेल्याने शेणखताच्या दरात उसळी आली आहे. दर चढलेले असले तरी खरड छाटणीला द्राक्षबागांना शेणखत आवश्‍यक असल्याने शेतकऱ्यांकडे शेणखत पुरवठादारांकडे मागणी नोंदविली जात आहे.

Dung Manure price hike 26 thousand rupees per truck Nashik News
Nashik | ढगाळ वातावरणाने वाढला उकाडा

शेणखताच्या वापरामुळे जमिनीतील जैवविविधता शाबूत राहत पोत सुधारतो. पाण्याचा निचरा होता. मातीचे संवर्धन होऊन आरोग्य सुधारते. सुपिकता येऊन उत्पादन वाढते. प्रक्रिया केलेल्या शेणखतांचा वापर केल्यास पिकांना आवश्‍यक असलेले सर्व सूक्ष्म व इतर अन्नद्रव्ये सहज उपलब्ध होते.

500 कोटींची उलाढाल
नाशिक जिल्‍ह्यात दोन लाख एकर द्राक्षाचे क्षेत्र पाहता लागणाऱ्या शेणखताची उलाढाल पाचशे कोटीच्या घरात आहे. मुंबईची परसबाग अशी ओळख असलेल्या नाशिकमधून फळभाज्या घेऊन ट्रक मुंबईला जातात. फळभाज्या बाजार समितीत पोहचविल्यानंतर रिकामे झालेले ट्रक तबेल्यात जाऊन शेणखत घेऊन नाशिकला येतात.

"द्राक्षबागांची गुणवत्ता टिकविण्यासाठी खरड छाटणीत खतांची मात्रा देणे आवश्‍यक असते. त्यात शेणखतामुळे द्राक्षबागाचे पोषण होते. पुढे फळधारणा छाटणीला त्याचे चांगले परिणाम दिसतात."
- सुनील जाधव (द्राक्ष उत्पादक, पिंपळगाव बसवंत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.