Republic Day Parade : राजपथावरील संचलनात नाशिकची दुर्गेशनंदिनी

Republic Day Parade
Republic Day Paradeesakal
Updated on

नाशिक : राजस्थानमधील बिरला बालिका विद्यापीठाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या पिलानी बॅन्ड पथकाचा प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचलनात सहभागी होण्याची परंपरा राहिली आहे.

२६ जानेवारीला होणाऱ्या संचलनातील बॅन्ड पथकात नाशिकमधील दुर्गेशनंदिनी राठोड हिचा समावेश आहे. दुर्गेशनंदिनीने आठवीपर्यंतचे शिक्षण नाशिकमधील फ्रावशी इंटरनॅशनल अकादमीतून पूर्ण केले असून ती नववीमध्ये बिरला बालिका विद्यापीठात शिकत आहे.

Republic Day Parade
NCC Day : PM मोदींपासून 'हे' सेलिब्रिटी होते NCC चे कॅडेट


बिरला बालिका विद्यापीठाच्या कार्यक्रमात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे उपस्थित होते. त्या वेळी येथील विद्यार्थिनींच्या बॅन्ड पथकाने संचलन केले होते. हे संचलन पाहून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९६० मध्ये प्रजासत्ताक दिनी राजपथावरील संचलनाचे निमंत्रण पिलानी बँड पथकाला दिले. त्या वेळेपासून हे बॅन्ड पथक राजपथावरील संचलनात सहभागी होते.

कोरोना काळातील दोन वर्षांचा अपवाद वगळता बॅन्ड पथकाने संचलनात सहभाग घेतला आहे. पिलानी बॅन्ड पथकाने २६ जानेवारीच्या संचलनासाठी विद्यापीठात तीन महिन्यांचा सराव केला आहे. १ जानेवारीपासून हे पथक नवी दिल्लीतील प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाले आहे. कडाक्याच्या थंडीत दररोज या पथकाने उत्साहाने सराव केला आहे.

Republic Day Parade
खुशखबर! इंडियन आर्मीत NCC भरती; तब्बल 2.50 लाख मिळणार पगार

पिलानी मुलींच्या बॅन्ड पथकात ५१ कॅडेट्स सहभागी असतील. या पथकाचे नेतृत्व स्वेच्छा गुप्ता करणार आहे. दरम्यान, दुर्गेशनंदिनी हिला लहानपणापासून वाद्य वाजवण्याचा छंद आहे. त्यामुळे पिलानी बॅन्ड पथकात समावेश होण्यासाठी तिला या छंदाचा उपयोग झाल्याचे तिचे वडील अभिमन्यू राठोड यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

विशेष म्हणजे, बिरला बालिका विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात सहभागी होण्याची संधी दुर्गेशनंदिनी हिला मिळालेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.