Nashik News : वर्षभरात 125 लाचखोरांना सापळा रचून पकडले

Bribe News
Bribe Newsesakal
Updated on

नाशिक : भ्रष्टाचाराला आळा घालताना लाचखोरांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सापळा रचत असते.

गेल्‍या वर्षभरात अशाच प्रकारे सापळा रचून लाचप्रकरणी १२५ जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. यापैकी सर्वाधिक ३० जण हे पोलिस विभागातील आहेत.

जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत केलेल्‍या कारवाईचा तपशील नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाहीर केलेला आहे. पाच जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्‍या या विभागाकडून बारा महिन्‍यात लाचखोरी प्रकरणात १२५ जणांवर सापळा रचून कारवाई करण्यात आलेली आहे. (During year 125 bribe takers caught Anti Bribery Department Take Strict Action Nashik News)

Bribe News
Nashik Crime News : अन्नदानाच्या बहाण्याने मंडप डेकोरेटरला गंडविले! भांडी घेऊन संशयित पसार

लाचखोरीची सर्वाधिक ३० प्रकरणे पोलिस विभागातील आहेत. त्‍यापाठोपाठ महसूल आणि जिल्‍हा परिषदेतील सेवकांना सापळा रचून कारवाई करण्यात आल्‍याचे समोर आलेले आहे.

वेगवेगळ्या कारणांनी सरकारी कार्यालयांमध्ये चिरीमिरीची मागणी केली जाते. या संदर्भात जनजागृती करताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून समोर येऊन तक्रार करण्याचे आवाहन केले जात असते.

या संदर्भात वर्षभर जनजागृती उपक्रमदेखील राबविले जात असतात. त्‍यानुसार वर्षभरात विभागाकडे प्राप्त तक्रारींवर आधारित १२५ जणांना सापळा रचून कारवाई करण्यात आलेली आहे. नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नगर असे पाच जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आलेली आहे.

Bribe News
Nashik News : ब्रेथ अनालयझर न वापरता होणार Drunk & Driveची कारवाई

राज्‍यात दुसरा क्रमांक

कारवाईसंदर्भात नाशिक विभागाचा राज्‍यात दुसरा क्रमांक आहे. विभागातर्फे वर्षभरात १७५ लाचखोरांना गजाआड केले आहे. यामध्ये शासकीय लोकसेवकांसह तब्‍बल ३८ खासगी व्‍यक्‍तींचाही समावेश आहे.

आदिवासी विभागात बलाढ्य कारवाई

वर्षभरात झालेल्‍या कारवाईंचा आढावा घेतला असता काही घटना चक्रावणार्या राहिल्‍या आहेत. यापैकीच आदिवासी विकास विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागूल यांच्‍यावर केलेल्‍या कारवाईचा समावेश आहे. या प्रकरणात तब्‍बल २८ लाख रुपयांची लाच घेताना संशयितास घरी सापळा रचून पकडले होते. यानंतर केलेल्‍या तपासणीत संबंधिताकडे कोट्यवधीची माया आढळून आली होती.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Bribe News
Nashik News : उद्यान मुलांना खेळण्यासाठी की मद्यपींसाठी?

'एसीबी'च्‍या कारवाईची विभागनिहाय आकडेवारी

विभाग लाचखोरीची प्रकरणे

पोलिस ३०

महसूल २१

जि.प./पंचायत समिती १५

वीज वितरण कंपनी १०

शिक्षण ०४

आदिवासी विकास ०४

खासगी व्यक्ती ०९

भ्रष्टाचार प्रकरणाचे चार गुन्‍हे

वर्षभरात भ्रष्टाचाराच्‍या चार प्रकरणांमध्ये गुन्‍हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये चौदा शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्‍याचे आढळून आलेले आहे.

वर्ग दोन, तीनमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण अधिक

विभागाकडून रचलेल्‍या सापळ्यात कारवाई झालेल्‍या लोकसेवकांमध्ये वर्ग तीन, चार स्‍तरावरील कर्मचाऱ्यांचा सर्वाधिक प्रमाण आहे. कारवाई केलेल्‍या १७५ संशयितांमध्ये वर्ग एकचे दहा, वर्ग दोनचे २५, वर्ग तीनचे तब्‍बल ९२ जणांचा समावेश आहे. तर वर्ग चारच्‍या दहा जणांवर कारवाई झालेली आहे. संशयितांकडून त्‍यांच्‍या नजीकच्‍या व्‍यक्‍तींना लाच स्‍वीकारण्यास सांगितले होते. अशा ३८ व्‍यक्‍तींनाही अटक केलेली आहे.

Bribe News
New Year 2023 : नववर्षाचे स्वागत उत्साहात करा पण नियम मोडल्यास कारवाई होणार...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.