कोरोनाचे संकट दूर होऊ दे! सीमोल्लंघनातून नाशिककरांचे भगवतीला साकडे

dussehra was celebrated in a traditional manner in nashik
dussehra was celebrated in a traditional manner in nashikSakal
Updated on

पंचवटी (नाशिक) : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्यात यश मिळत असल्याने काहीशा निर्धास्त झालेल्या नाशिककरांनी पारंपरिक पद्धतीने सीमोल्लंघन करत आई भगवतीला कोरोनारूपी संकट आता दूर होऊ दे, म्हणत साकडे घातले. भाविकांनी श्री कालिकादेवीसह ग्रामदैवत भद्रकाली, सांडव्यावरील देवी, कपालेश्‍वर, श्री काळारामासह अन्य मंदिरांत श्रद्धापूर्वक दर्शन घेत खऱ्या अर्थाने विजयाचे सीमोल्लंघन केले.


कोरोना उद्रेकामुळे गतवर्षी मंदिरांसह सर्वत्र लॉकडाउन होते. या काळात नागरिकांना घराबाहेर पडताच आले नव्हते. यंदा या परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाल्याने सायंकाळनंतर सर्वच मंदिरांमध्ये सोने वाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी करत या चैतन्य पर्वाची अनुभूती घेतली. दसऱ्यामुळे बाजारातही मोठा उत्साह होता.

कालिकादेवी दर्शनासाठी गर्दी

नाशिककरांचे मोठे श्रद्धास्थान असलेल्या कालिकादेवीच्या दर्शनासाठी गत नऊ दिवसांच्या तुलनेत पहाटेपासून मोठी गर्दी उसळली होती. देवस्थानाकडून ऑनलाइन बुकिंगसह थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझेशन याबाबत विशेष दक्षता घेतली जात होती. दुपारी बाराला विश्‍वस्त व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत शस्त्रपूजन झाले. राज्यातील रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्‍वभूमीवर ट्रस्टतर्फे झालेल्या पाचदिवसीय रक्तदान शिबिरातून शंभर बाटल्या रक्तसंकलन झाले. सीमोल्लंघनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी उसळली होती.

dussehra was celebrated in a traditional manner in nashik
नाशिक : भाव वधारू लागल्याने चाळीतला कांद्याची निवडानिवड सुरू

सोने लुटण्यासाठी भाविकांची गर्दी

वणीच्या सप्तशृंगीचे प्रतिरूप समजल्या जाणाऱ्या गंगाघाटावरील सांडव्यावरील देवीदर्शनासाठी भाविकांची सकाळपासून गर्दी होती. त्यात महिला भाविकांचा वाटा मोठा होता. गर्दी टाळण्यासाठी या वर्षी मंदिरात उत्तरेकडून प्रवेश देण्यात आला होता. महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा करण्यात आल्या होत्या. भाविकांनी रस्त्यात वाहने उभी केल्याने आजही या भागात वाहतूक कोंडी झाली. ग्रामदैवत भद्रकाली देवी मंदिरातही सोने लुटण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. महिला भाविकांनी कोरोना संकट दूर होऊन संपन्नता दे, असे साकडे घातले.

खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन करावे

पूर्वीच्या काळी राजे-महाराजे या दिवशी देवीचा आशिर्वाद घेऊन सीमोल्लंघनाला म्हणजे युद्धाला निघत. आधुनिक काळात अज्ञानाचा नाश ज्ञानाने, अंधाराचा नाश उजेडाने करावा, अशुभ गोष्टींचा त्याग करत अज्ञानातून बाहेर पडत ज्ञानार्जन करावे, तरुणांनी व्यसनाधीनता सोडत खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन करावे, असे आवाहन धर्म व ज्योतिष अभ्यासक पंडित नरेंद्र धारणे यांनी केले.

dussehra was celebrated in a traditional manner in nashik
नाशिक : भाव वधारू लागल्याने चाळीतला कांद्याची निवडानिवड सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()