Nashik News : द्वारका चौकावर ट्रॅव्हल्सचालकांचा कब्जा! आरेरावी, दादागिरीचे प्रकार वाढले

An ambulance stuck by a private bus on the way to Dr. Zakir Hussain Hospital.
An ambulance stuck by a private bus on the way to Dr. Zakir Hussain Hospital.esakal
Updated on

Nashik News : द्वारका चौकात ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी वाढली आहे. रस्त्यात खासगी बस उभ्या करून नागरिकांना, तसेच इतर वाहनांना अडचणी केल्या जातात. बस हटविण्यास सांगितल्यास अरेरावी करत वाद घातले जातात.

चौकात नियुक्त पोलीस मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत असतात. कुठलीही कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस अरेरावीचे प्रकार वाढत आहेत. (Dwarka Chowk occupied by travel drivers forms of bullying traffic increased Nashik News)

शहराचे मुख्य प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या द्वारका चौकातून शहरात चारही दिशांना चोवीस तास मोठी वर्दळ असते. त्यामुळे दिवसभरात अनेक वेळा येथे वाहतूक कोंडीची समस्या जाणवते. वाहतूक कोंडी काहीशी कमी व्हावी, या उद्देशाने चौकात मुख्य मार्गास लागून सर्विस रोड तयार करण्यात आले आहेत.

दुचाकी, तीनचाकी वाहनांसह पादचारी नागरिकांना ये-जा करण्यासाठी या सर्विस रोडचा वापर व्हावा, अशी अपेक्षा आहे. त्यातच, परिसरातील रुग्णालयांत रुग्णवाहिकांना वेळेत पोचता यावे, यासाठीही सर्विस रोडचा वापर केला जातो.

प्रत्यक्षात मात्र या सुविधा तर दूरच, उलट नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. चौकातील ट्रॅव्हल्स चालकांनी सर्विस रोडचा ताबा घेतला आहे. त्यांच्या मोठ-मोठ्या लक्झरी बस सर्विस रोडवर उभ्या केल्या जातात. त्यामुळे अन्य वाहनांना तेथून जाणे शक्य होत नाही.

त्यातून, वाहतूक कोंडी तर होतेच; शिवाय पादचारी व रुग्णवाहिकाही त्यात अडकतात. याच मार्गावर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय असल्याने रुग्णवाहिकांना अडथळा निर्माण होण्याची समस्या अनेक वेळा जाणवते. ट्रॅव्हल्स चालकांकडे तक्रार केली असता, त्यांच्याकडून अरेरावी केली जाते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

An ambulance stuck by a private bus on the way to Dr. Zakir Hussain Hospital.
Nashik News : चार्जिंग सुरू असताना मोबाईलचा स्फोट; खासगी मार्केटमधील पत्र्यांच्या गाळ्यांना आग

वाद घालण्याचे प्रकार घडतात. त्यातून मारहाणीच्या घटनाही घडल्या आहेत. गुन्हेगारीस वाव मिळत असल्याने पोलिसांनी कारवाई करत सर्विस रोडवर लक्झरी बस उभ्या करण्यास बंदी करावी. रुग्णवाहिका, नागरिकांसाठी सर्विस रोड खुला करून देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

पोलीस आयुक्तांना निवेदन

ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी आणि अरेरावीवर अंकुश लावावा. सर्विस रोडवरील ट्रॅव्हल्स चालकांचे अतिक्रमण कायमस्वरूपी काढण्यात यावे. अशा मागणीचे निवेदन पोलीस आयुक्तांना, तसेच भद्रकाली पोलिसांना देण्यात आले आहे. पोलिसांकडून काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

"द्वारका भागात ट्रॅव्हल्स चालकांची प्रचंड मनमानी वाढली आहे. त्यांच्या बस रस्त्यावर उभ्या करून वाहतूक कोंडी केली जाते. वाहतुकीस अडचण निर्माण होत असते. पायी चालणे अवघड झाले आहे." -समीर खतीब, रहिवासी

"ट्रॅव्हल्स बस दोन-पाच मिनिट उभ्या राहिल्यास हरकत नाही. पण, त्या अर्धा ते पाऊण तास एकाच ठिकाणी रस्त्यावर उभ्या राहतात. अशा वेळेस परिसरातील मंदिर, रुग्णालयांत जाताना अडचण निर्माण होते. त्यांना सांगायला गेल्यास अरेरावी करतात."

-बाळासाहेब नळवाडे, रहिवासी

An ambulance stuck by a private bus on the way to Dr. Zakir Hussain Hospital.
Nashik Crime News : महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये शहरात वाढ; 2 घटनांत अतिप्रसंग, एक विनयभंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.