E-Bike : नाशिकच्या युवा अभियंत्यांनी साकारली E-1 बाईक

Nashik News
Nashik News esakal
Updated on

नाशिक : येथील स्‍टार्टअप असलेल्‍या ॲट्म्स अलाईव्ह टेक्‍नॉलॉजी यांच्‍यातर्फे शनिवारी (ता.२४) ई-बाईक बाजारात दाखल केली आहे. नाशिकचे युवा अभियंते कुणाल दाणी आणि आशिष पवार यांची निर्मिती असलेली 'ई-१' ही ई-बाईकला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरण संवर्धनासह सायकल चळवळ वृद्धींगत करण्यासाठी उपयुक्‍त ठरेल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

Nashik News
E-Bike Speed : ई-बाईक ओलांडताहेत वेगमर्यादा

सध्याच्या काळात इंधनाच्‍या वाढत्‍या किमती, सुदृढ आरोग्‍यासाठी वाढलेले महत्त्व, पर्यावरण संवर्धनाची आवश्‍यकता असे अनेक उद्देश पूर्ण करण्यासाठी ॲट्म्स अलाईव्हने ई-१ ही त्यांची ई- बाईक साकारलेली आहे. सायकलप्रमाणे पेडल मारून चालवता येणारी ई-बाईक जवळच्या अंतरासाठी ॲक्सीलरेटरनेही चालवता येते. ‘व्होकल फोर लोकल’ अभियानाला अनुसरून मित्सुरा आर्ट फेस्टमध्ये या उत्‍पादनाचे अनावरण करण्यात आले आहे.

Nashik News
Nashik News : 'धूमस्टाईल' Bike Ridingवर आयुक्तांची करडी नजर! गाड्यांच्या मालकांवर होणार गुन्हे दाखल

नाशिकमध्ये झालयं शिक्षण

के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातून कुणाल दाणी याने तर एमईटी अभियांत्रिकी महाविद्यालयातून आशिष पवार याने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले आहे. पुढे दोघांनी एकत्र येत स्टार्टअप सुरू केले. या माध्यमातून नाशिक व पुणे येथे कार्यालय कार्यान्‍वित केले आहे.

हेही वाचा: Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

जलद गतीने चार्जिंसाठी मिळालेय पेटंट

'ॲट्म्स अलाईव्ह' ही जलद चार्जिंग तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. या तंत्रज्ञानासाठी कंपनीने पेटंट मिळविले आहे. सध्या या तंत्रज्ञानाचा उपयोग पॉवर बँक आणि हब्स यासारख्या स्मार्टफोनला लागणार्या उपकरणांमध्ये केला जातो आहे.

Nashik News
Wrong Fuel In Bike: गाडीत पेट्रोलऐवजी डिझेल भरले तर? नुकसान टाळण्यासाठी त्वरित करा 'हे' काम

''नाशिकमध्ये प्राप्त केलेले ज्ञान, कौशल्‍यांच्या आधारे साकारलेली ई-बाईक ग्राहकांच्‍या पसंतीस उतरते आहे. कमाल पंचवीस किलोमीटरची वेग मर्यादा असलेल्‍या या सायकल खरेदीसाठी कर्ज पुरवठा उपलब्‍ध करुन दिला जाईल.'' - कुणाल दाणी, सहसंस्‍थापक, ॲट्म्स अलाईव्ह.

''सध्या मुंबईत ई-बाईकची बांधणी केली जात असली तरी भविष्यात नाशिकला कारखाना विस्‍तारण्याचे उदिष्ट ठेवलेले आहे. अन्‍य काही उत्‍पादने विकसीत करण्यासाठी प्रयत्‍न सुरु असून, लवकरच ही उत्‍पादने अवगत केली जातील.'' - आशिष पवार, सहसंस्‍थापक, ॲट्म्स अलाईव्ह.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()