नाशिकमध्ये धावणार E-bus; तोटा शून्यावर आणण्यासाठी सिटीलिंकची योजना

नवी मुंबईच्या धर्तीवर नाशिक शहरात E-bus बस चालविल्या जाणार
 electric bus
electric busesakal
Updated on

नाशिक : शहर बससेवेचा किलोमीटर मागे होणारा तोटा कमी करण्यात सिटीलिंक कंपनी राज्यात पहिल्या क्रमांकावर असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आता किलोमीटर मागील तोटा आणखी कमी करण्यासाठी ‘ई- बस’ (e-bus) रस्त्यावर उतरविणार आहे. केंद्र व राज्य सरकारकडून त्यासाठी अनुदान मिळविले जाणार आहे. (latest marathi news)

 electric bus
दुसऱ्या पक्षात प्रवेश, ... अन्यथा अपात्रता अटळ!

महापालिकेच्या सिटीलिंक शहर बससेवेची शुक्रवारी (ता. ८) वर्षपूर्ती झाली. त्याअनुषंगाने बससेवेच्या नफा व तोट्याचा आढावा घेण्यात आला. वर्षभरात सिटीलिंक कंपनीच्या बसमधून एक कोटी ६३ लाख प्रवाशांनी प्रवास केला. सेवा सुरू झाली, त्यावेळी पहिल्या दिवशी २७ बस रस्त्यावर उतरविण्यात आल्या. सध्या ४६ मार्गावर २१० बस रस्त्यावर धावत आहे. दररोज ७० हजार प्रवासी प्रवास करतात, तर दररोजचे उत्पन्न वीस लाख रुपये आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन आणखी ४० बस रस्त्यावर उतरविल्या जाणार आहेत. पहिल्या वर्षासाठी साठ कोटी रुपयांची तरतूद सिटी बससाठी करण्यात आली होती. एक वर्षात सिटीलिंक कंपनीवर ७१ कोटी अठरा लाख रुपये खर्च झाले असले तरी उत्पन्न मात्र ३९ कोटी रुपये प्राप्त झाले.

वर्षाचा तोटा ३२ कोटी रुपयांपर्यंत पोचला. सद्यःस्थितीत प्रतिकिलोमीटर उत्पन्न हे ४५ रुपयांपर्यंत पोचले आहे. त्यामुळे प्रतिकिलोमीटर उत्पन्नाच्या बाबतीत सिटीलिंक महाराष्ट्रात अव्वल ठरली आहे. सिटीलिंक कंपनीकडून बससेवा सुरू झाल्यानंतर प्रारंभी तोटा कमी होता. परंतु, इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत गेल्याने तोटा वाढला. वर्षभरात सीएनजी व डिझेलच्या किमतीत ३३ टक्के वाढ झाली. सध्या प्रतिकिलोमीटर जवळपास नऊ रुपयांचा तोटा आहे. सध्या डिझेलच्या किमती प्रतिलिटर ९६ रुपये, तर सीएनजी ६५ रुपये प्रतिकिलोपर्यंत मिळत असल्याने तोटा कमी करण्यात अडथळे निर्माण होत आहे.

 electric bus
नाशिकच्या राजकारणाला फुटताहेत नवे धुमारे

केंद्र सरकारकडील प्रस्ताव रखडला

तोटा कमी करण्यासाठी ई- बस चालविल्या जाणार आहेत. या माध्यमातून प्रतिकिलोमीटर मागे तोटा किमान दहा टक्क्यांपर्यंत आणला जाणार आहे. केंद्र सरकारच्या शाश्‍वत विकास उद्दिष्ट व संयुक्त राष्ट्रांच्या नियमानुसार नेट झिरो कार्बन उत्सर्जक शहर साध्य करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स बसचा पर्याय निवडण्यात आला आहे. महापालिकेने यापूर्वी केंद्र सरकारकडे पन्नास बससाठी अनुदानाचा प्रस्ताव सादर केला होता. परंतु, त्या प्रस्तावाला अद्यापही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता नव्याने प्रस्ताव सादर केला जाणार आहे. राज्य शासनाकडूनदेखील अनुदान मिळणार आहे. नवी मुंबईत इलेक्ट्रॉनिक्स बस सुरू आहेत. त्याच धर्तीवर नाशिक शहरात बस चालविल्या जाणार असल्याची माहिती सिटीलिंक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी चव्हाणके यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()