Nashik News: शहरात लवकरच सिग्नलवर ई-चलन यंत्रणा! 800 CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून वाहतुकीवर नियंत्रण

Police officers inspecting the Command Control Center of SmartCity Company
Police officers inspecting the Command Control Center of SmartCity Companyesakal
Updated on

Nashik News : नाशिक म्युनिसिपल स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे शहरात नाशिक स्मार्ट ॲन्ड सेफ सिटी सोल्यूशन्स या प्रकल्प राबविण्यात आला आहे. त्याअंतर्गत आठशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून, त्याअनुषंगाने मुख्य रस्त्यांवरील सिग्नलवर ई- चलन यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.

स्मार्टसिटी कंपनीच्या कार्यालयातील इंटिग्रेटेड कमांड ॲन्ड कंट्रोल सेंटरमध्ये ई-चलन पद्धतीची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली. (E chalan system soon on signal in city Traffic control through 800 CCTV cameras Nashik News)

शहर वाहतूक पोलिस दलांच्या नऊ महिला कॉन्स्टेबल यांना पोलिस आयुक्तालयात असलेल्या कमांड ॲन्ड कंट्रोल सेंटरमध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणामध्ये आपत्ती निरीक्षण, सार्वजनिक ठिकाणी पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीमवरून घोषणा करणे, वाहतूक मॉनिटरिंग आणि ई-चलन जारी करणे याचा समावेश होता.

शहरातील ४० सिग्नलवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. त्यातील कॅमेरे नियंत्रण कक्षाला जोडण्याचे काम सुरू असून यासाठी आवश्यक असलेल्या ऑप्टिकल फायबर केबलचे काम बीएसएनएल कंपनीद्वारे प्रगतिपथावर आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Police officers inspecting the Command Control Center of SmartCity Company
Nashik News: ‘ग्रीन फिल्ड’ मूल्यांकन लटकले; सोलापूरच्या आंदोलनाचा परिणाम

ही प्रणाली या तंत्रज्ञानाच्या मदतीने कार्यरत राहील. यामध्ये प्रामुख्याने एएनपीआर व आरएलव्हीडी या दोन प्रकारच्या कॅमेऱ्यांचा समावेश असणार आहे. वाहन मालकाच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर उल्लंघनाच्या फोटोसह दंडाचे ई- चलन प्राप्त होईल.

या प्रणालीमुळे वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी, तसेच शहरातील रहदारीवर नियंत्रण मिळवण्यासाठीही पोलिसांना मदत होणार आहे.

यासोबतच आगामी २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दरम्यान ही प्रणाली उपयोगी पडेल, असा दावा स्मार्टसिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

Police officers inspecting the Command Control Center of SmartCity Company
Nashik: वर्षभरापासून मालेगाव ‘पोषण आहारा’चा प्रश्न सुटेना! खासगी शाळांसह सेंट्रल किचनचे ठेकेदार न्यायालयात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.