Sakal Social Foundation : 6 शाळांना ई-लर्निंग संच ‘सकाळ सोशल फाउंडेशन’तर्फे उपक्रम

Students at distribution of e-learning kit at Kailas Math.
Students at distribution of e-learning kit at Kailas Math.esakal
Updated on

Sakal Social Foundation : ‘सकाळ’ माध्यम समूहातील सकाळ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून व अंबड एमआयडीसीमधील अ‍ॅडटेक इन्व्हेन्शन्स कंपनीच्या सीएसआर निधीअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील सहा शाळांना ई - लर्निंग संचाचे वाटप करण्यात आले.

या वेळी पंचवटीतील पेठ रोडवरील कैलास मठामध्ये देशभरातील शेकडो विद्यार्थी वेद शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. वेद शिक्षणाचे धडे घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ई-लर्निंग संचाच्या माध्यमातून शैक्षणिक धडे गिरविता यावे, याकरिता या विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंग संच देण्यात आला. (E Learning package to 6 schools organized by Sakal Social Foundation nashik news)

‘सकाळ’ माध्यम समूहाकडून वेळोवेळी सामाजिक बांधिलकी स्वीकारून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. शालेय विद्यार्थ्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून, विद्यार्थ्यांनी डिजिटल साक्षर होणे आवश्यक आहे.

हे ओळखून ‘सकाळ’ माध्यम समूहातील सकाळ सोशल फाउंडेशनच्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ अभियानांतर्गत दुर्गम व आदिवासी भागातील शाळांना डिजिटल ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या वर्षी पुणे, नगर व कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास ३४ शाळांना ४५ ई-लर्निंग संचाचे वाटप करण्यात आले आहे. उपक्रमास अ‍ॅडटेक इन्व्हेन्शन्स कंपनीचे मार्केटिंग संचालक प्रशांत शिंपी यांचे सहकार्य मिळाले.

Students at distribution of e-learning kit at Kailas Math.
Nashik MD Drug Case: मुंबईतून एमडी ड्रग्ज पेडलरला अटक; वडाळ्याचे मुंबई ड्रग्ज कनेक्शन

संचाचे वाटप करण्यात आलेल्या इतर पाच शाळा

संत ज्ञानेश्वर प्राथमिक, संत तुकाराम माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा (चापडगाव, ता. सिन्नर)

श्री जोगेश्वरी प्राथमिक आश्रमशाळा, पाटोळे (ता. सिन्नर), नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ संचालित व आदिवासी विकास विभाग योजनेंतर्गत नामांकित निवासी इंग्रजी माध्यमिक शाळा

शिवाजी मित्रमंडळ, गंगापूर नाशिक संचालित राजीव गांधी माध्यमिक विद्यालय तळवाडे (ता. त्र्यंबकेश्वर)

शिवाजी मित्रमंडळ, गंगापूर, नाशिक संचालित इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालय, सातपूर

Students at distribution of e-learning kit at Kailas Math.
IT Raid Nashik : नाशिक-सिन्नर रस्त्यावरील टोलनाक्यावर आयकर विभागाची धाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.