कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सभासदासाठी ई-नॉमिनेशन अनिवार्य

EPFO
EPFOesakal
Updated on

सातपूर (नाशिक) : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सभासदासाठी आता ई-नॉमिनेशन अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे आता भविष्य निधी , विमा आणि पेन्शनचा लाभ घेणाऱ्या लोकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. दरम्यान पीएफ खातेदारांनी नामांकन अर्ज न भरल्यामुळे त्यांना विमा किंवा पेन्शनचा लाभ मिळण्यात अडचणी येत होत्या त्या आता येणार नाही. भविष्य निधी खातेधारकाचा मृत्यू झाल्यास, कुटुंबातील सदस्यांना कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येतात. त्यामुळे या सर्व समस्या सोडवण्यासाठी भविष्य निर्वाह निधीचा हा निर्णय खूप फायदेशीर ठरणारा आहे.

पीएफ खातेदारांनी ई-नॉमिनेशन केल्यास निवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ खातेधारकांना उपलब्ध होईल व त्यास पेन्शन चा फोर्म ऑनलाईन भरण्यास खूप सोपे होणार आहे व त्यासाठी त्यास कागदपत्रे व इतर माहिती साठी हेलपाटे मारावे लागणार नाही.

पीएफ खातेदाराने जर एकदा इनॉमिनेशन केले असेल व त्यास जर ते बदलावयाचे असेल तर तो ते अगदी सहजपणे बदलू शकणार आहे.तसेच खातेधारकांनी ई-नॉमिनेशन केल्यास त्यांना एनओसी घेण्याची गरज भासणार नाही. जर कर्मचारी विवाहित असेल, तर त्याच्या पत्नीचे आधार-मतदार कार्ड, फोटोसह ई-नामांकन दाखल करावे लागेल. या अंतर्गत आता कोणतीही विवाहित व्यक्ती या सुविधेअंतर्गत नॉमिनीचे नाव सहज नोंदवू शकते.

अशी माहिती नाशिक क्षेत्रिय भविष्य निधी आयुक्त श्री अनिलकुमार प्रीतम यांनी दिली व असे आवाहन केली कि सर्व भविष्य निधी सभासदांनी इनॉमिनेशन तत्परतेने करून घ्यावे व आपल्या कुटुंबास सुरक्षित करावे.

EPFO
पीएफचा व्याजदर घटला म्हणून काय झालं? या ५ योजना देतील उत्तम परतावा

ई-नामांकन करण्यासाठी स्टेप्स पुढीलप्रमाणे

सर्वात आधी ईपीएफओ (EPFO) पोर्टलमधील सेवा विभागात, कर्मचार्‍यांसाठी (फॉर एम्प्लॉइज) वर क्लिक करा. त्यानंतर यूएएन (UAN) किंवा ऑनलाइन सेवा वर क्लिक करा.

सदस्य पोर्टल (मेंबर पोर्टल) जनरेट होत नसल्यास, आधी सदस्य पोर्टल तयार करा आणि लॉगिन करा.

तुमचा फोटो आणि इतर माहिती अपडेट करण्यासाठी प्रोफाइलवर क्लिक करा.

आता सदस्य पोर्टलवर, मॅनेजवर ई-नामांकन निवडा आणि फॅमिली डिक्लेरेशनवर होय किंवा नाही वर क्लिक करा.

कुटुंबाचा तपशील (अॅड फॅमिली डिटेल्स) वर क्लिक करा आणि इतर तपशील आणि फोटोसह संबंधितांचा आधार क्रमांक जोडा.

आता संपूर्ण कुटुंबाचे तपशील अपडेट केल्यानंतर सेव्ह फॅमिली डिटेल्स (Save Family Details)वर क्लिक करा.

आता सेव्ह ई-नॉमिनेशन वर क्लिक करा आणि सदस्याचा आधार क्रमांक टाकून यूआयडीएआय (UIDAI) वेबसाइटवरून व्हर्च्युअल आयडी तयार करा, ज्याचा एक एसएमएस मिळेल.

त्यानंतर पुढील सदस्य पोर्टलवर ई-साइन वर क्लिक करा आणि आधारवरून व्हर्च्युअल आयडी टाकून जनरेट ओटीपी वर क्लिक करा.

आधारशी लिंक केलेल्या मोबाईलवर सहा अंकी ओटीपी (OTP) येईल, दिलेल्या जागेत ओटीपी टाका आणि सबमिट करा.

अशाप्रकारे तुमचे ई-नामांकन यशस्वीपणे सबमिशन केल्यावर पूर्ण होईल.

"भविष्यात पिएफ सभासदाना कुठलीही अडचण न येता त्यांना आपला हक्काचा पैसा व पेन्शन सहज उपलब्ध होण्यासाठी ई नाॅमिनेशन (हायातीचा दाखला) अनिवार्य केले आहे."

- अनिल कुमार प्रितम (भविष्य निर्वाह निधी आयुक्त)

EPFO
नोकरदार वर्गाला झटका; पीएफच्या व्याजदरात घट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.