Nashik News : E- Shivai धावणार नाशिक-पुणे मार्गावर!

E- Shivai
E- Shivaiesakal
Updated on

नाशिक : वाढत्‍या प्रदूषणावर उपाययोजना करताना राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाच्‍या ताफ्यातही इलेक्‍ट्रिक व्हेकल दाखल होत आहेत. राज्‍यपातळीवर ‘ई-शिवाई’ बसची महत्त्वाकांक्षी योजना राबविली जात आहे.

या बसगाड्यांची संख्या वाढवत असताना आवश्‍यक पायाभूत सुविधांचा विकास केला जात आहे. एन. डी. पटेल मार्गावरील आगार क्रमांक एकमध्ये चार्जिंग स्‍टेशन उभारणीचे काम अंतिम टप्प्‍यात आहे.

संपूर्ण यंत्रणा कार्यान्‍वित होऊन बस उपलब्‍ध झाल्‍यास नाशिक-पुणे मार्गावरील प्रवाशांच्या सेवेत ही बसगाडी धावणार आहे. (E Shivai bus start on Nashik Pune route Construction of charging station in Agar of Corporation Nashik News)

E- Shivai
SAKAL Impact News : उद्यान स्वच्छता मोहीमेस सुरवात; कालिका उद्यानातील खेळण्यांचीही लवकरच होणार दुरुस्ती
नाशिक : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगर क्रमांक एकच्या आवारात चार्जिंग स्टेशनचे बांधकाम सुरू आहे.
नाशिक : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगर क्रमांक एकच्या आवारात चार्जिंग स्टेशनचे बांधकाम सुरू आहे.esakal

इंधनाच्या वाहनांमुळे होणारे वायुप्रदूषण हा गंभीर मुद्दा बनला असून, यावर उपाययोजना करताना केंद्र शासनाच्‍या फेम-२ योजनेंतर्गत ई-वाहनाचा पर्याय सुचविलेला होता. त्‍यानुसार एसटी महामंडळाकडून पर्यावरणपूरक आणि आरामदायी ‘ई-शिवाई’ बस रस्त्यावर उतरविण्याचे नियोजन आखले आहे.

नाशिक विभागाचा विचार करता साधारणतः पंचवीस ते तीस ‘ई-शिवाई’ बसगाड्या पहिल्‍या टप्प्‍यात उपलब्‍ध होण्याची शक्‍यता आहे. या बसगाड्यांना चार्जिंग स्‍टेशनची आवश्‍यकता भासणार आहे. या स्‍टेशनची उभारणी आगार क्रमांक एकच्‍या परिसरात केली आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

E- Shivai
Nashik News : पंचवटी, सिडकोत 200 खाटांचे रुग्णालय; NMCचे 55 कोटींचे 2 प्रस्ताव!

स्‍वतंत्र ट्रान्स्फॉर्मर, वीजजोडणीची प्रतीक्षाच

जास्‍त क्षमतेने वीजपुरवठा अपेक्षित असल्‍याने महामंडळाकडून कर्मचाऱ्याच्या जुन्या वसाहतीच्‍या जागेतील पंधरा गुंठे क्षेत्र ३३ केव्हीचे उपकेंद्र उभारण्यासाठी दिलेली आहे. जागेसाठी नाममात्र दर आकारले जाणार आहेत. महामांडळाला ११ केव्‍हीची आवश्‍यकता असणार आहे. उर्वरित वीज महावितरणामार्फत अन्‍य ग्राहकांना उपलब्‍ध करणार आहे. दरम्‍यान, स्‍वतंत्र ट्रान्स्फॉर्मर बसविला जाणार असला तरी महावितरणकडून ही कार्यवाही पूर्ण करुन वीजजोडणीची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे.

एकाच वेळी चार बसगाड्या होणार चार्ज

आगारात उभारलेल्‍या चार्जिंग स्‍टेजनच्‍या ठिकाणी संपूर्ण अंतर्गत यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्‍यानुसार चार बसगाड्या एकाच वेळी चार्ज करता येतील, अशी सुविधा केली असल्‍याचे महामंडळाच्‍या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. बसगाड्यांची संख्या वाढल्‍यानंतर चार्जिंग पॉइंटच्या संख्येतही वाढ केली जाईल, असे सांगण्यात आले.

E- Shivai
Nashik News : 12 वर्षीय बालकाच्या अपहरण प्रकरणातील चौथा संशयित गजाआड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.